Dhule News : धुळे बाजार समितीत कामांचे लोकार्पण

तालुक्यातील प्रत्येक माणूस हाच माझा पक्ष आहे आणि तालुका हेच माझे कुटुंब असल्याचे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केले.
Kunal Patil and director were present at the inauguration of the development works in the market committee on Thursday.
Kunal Patil and director were present at the inauguration of the development works in the market committee on Thursday.esakal
Updated on

Dhule News : धुळे तालुक्यात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाची कामे करीत असतो. त्यामुळे सर्वच पक्षांतील कार्यकर्ते विकासासाठी सहकार्य करीत असतात.

त्यामुळे या तालुक्यातील प्रत्येक माणूस हाच माझा पक्ष आहे आणि तालुका हेच माझे कुटुंब असल्याचे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २५) बाजार समितीत विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. (Inauguration of works in Dhule Bazar Committee news)

आमदार पाटील यांनी सांगितले, की बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पकालावधीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी विविध कामे करीत विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे.

सभापती बाजीराव पाटील म्हणाले, की विकासकामांसाठी संचालकांचे सहकार्य मिळत असते. बाजार समिती शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडींना सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळात अव्वल दर्जाची बाजार समिती करणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील यांच्या हस्ते बाजार समितीत तीस व्यापारी गाळे आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरओ फिल्टर प्लांटचे लोकार्पण, जनावरांच्या बाजारातील दोन काँक्रिट रस्ते, भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन झाले.

Kunal Patil and director were present at the inauguration of the development works in the market committee on Thursday.
Dhule Marathon 2024 : मॅरेथॉनला शिक्षण संस्थांकडून ‘चिअर-अप’

उपसभापती योगेश पाटील, संचालक महादेव परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, संचालक गुलाबराव कोतेकर, साहेबराव खैरनार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील.

प्रमोद जैन, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, पंढरीनाथ पाटील, भगवान गर्दे, अरुण पाटील, राजेंद्र भदाणे, आप्पा खताळ, प्रकाश पाटील, गंगाधर माळी, नयना पाटील, सुरेखा बडगुजर, गणेश गर्दे, गायत्री जयस्वाल, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

Kunal Patil and director were present at the inauguration of the development works in the market committee on Thursday.
Dhule News : जिल्ह्यात शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधीवाटप : पालकमंत्री महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.