Dhule Crime News : टोळक्याचा तलवारीने तरुणावर हल्ला

किरकोळ वादातून टोळक्याने युवकावर तलवार, लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये घडली.
crime
crimeesakal
Updated on

Dhule Crime News : किरकोळ वादातून टोळक्याने युवकावर तलवार, लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये घडली. जखमी युवकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, संशयितांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्यात आला. काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. (incident of gang attacking youth with sword and iron rod due to petty dispute dhule crime news)

सूरज जितेंद्र जाधव (वय २५, रा. लक्ष्मीनारायणनगर, शिरपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असून, महात्मा फुले मार्केटमध्ये सूरज टी हाउस चहाचे दुकाही चालवितो.

७ फेब्रुवारीला रात्री दुकान बंद करून नैसर्गिक विधीसाठी गेला. दरम्यान, माउली हॉस्पिटलच्या मागील परिसरात खंडू तथा गणेश प्रकाश काविरे (रा. के.जी. रोड, अंबिकानगर, शिरपूर) याच्याशी विष्णू रवींद्र साबळे, विशाल पवार, पृथ्वीराज कोळी, बादल मनोज पवार, बादल सीताराम पवार (सर्व रा. आमोदे, ता. शिरपूर) यांचा वाद सुरू होता.

त्या वेळी बादल पवार याने सूरजला दमदाटी करून हाकलून दिले. काही वेळाने दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी सूरज जाधव मित्र गोविंद वाडे याच्यासोबत शिरपूर फाटा येथे गेला. त्या वेळी संशयित तेथे उभे होते.

crime
Mumbai Crime News : मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल, एफआयआर दाखल

बादल पवार याने त्याला उद्देशून आमच्याशी भांडण करायला आलास का, असे बोलून मारहाण केली. त्याला प्रतिकार करून सूरज जाधव दुकानावर परत आला. रात्री पावणेअकराला संशयित त्याच्या दुकानासमोर पोचले.

‘तू माजला असून, आम्हाला नडतो का’ असे सांगून त्यांनी तलवार व लोखंडी रॉडने सूरजला बेदम मारहाण केली. त्यांच्यापासून सुटका करून घेत सूरज शेजारील सुशांत पाटील यांच्या भाजीपाला मार्केटमधील दुकानाच्या आडोशाला लपला.

संशयितांनी दुकानासमोर ठेवलेला वजनकाटा फोडला. समाधान राजपूत याने जखमी सूरजला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या फिर्यादीवरून संशयित विष्णू साबळे, विशाल पवार, पृथ्वीराज कोळी, बादल मनोज पवार, बादल सीताराम पवार (सर्व रा. आमोदे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक निकम तपास करीत आहेत.

crime
Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.