Nandurbar Dengue News : शहरात सध्या डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांनी योग्य ती काळजी घेत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी केले आहे.
याबाबत मुख्याधिकारी श्री. बागूल यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे, की सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा अंदाज घेता रुग्णांमध्ये डेंगी-मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. (Increase in dengue cases in Nandurbar city news)
त्यामुळे या साथीच्या झपाट्यातून वाचता यावे, आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे, यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काळजी घेणे आवश्यक आहे. पालिकेतर्फे नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांनीही शहरातील आपल्या परिसरातील स्वच्छतेसह घरातील स्वच्छता व काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी कळविले आहे.
हद्दीत कीटकजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी डेंगीप्रसारक डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होत असल्याने आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, घराजवळील खड्डे, डबकी बुजवावीत. जेणेकरून पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही, घरातील पाणीसाठ्यांच्या सर्व प्रकारच्या भांड्यांना (माठ, रांजण, हौद, पिंप, प्लास्टिक टाक्या, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, घरातील पाण्याचा टाक्या इ.) घट्ट झाकण बसविणे तसेच या पाणीसाठ्यांची भांडी आवड्यातून एकदा पूर्णपणे रिकामी करून, घासूनपुसून कोरडी स्वच्छ करून पुन्हा पाण्याने भरणे व व्यवस्थित झाकावी.
(डास त्या भांड्यांमध्ये अंडी घालण्यासाठी प्रवेश करू शकणार नाहीत, अशा पद्धतीने झाकणे अथवा कापडाने झाकून ठेवणे), दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावावी. विशेषतः नारळाच्या करवंट्या इतरत्र न टाकता त्या जाळून किंवा पुरून टाकाव्यात. फुटक्या बाटल्या, प्लास्टिकची भांडी उघड्यावर ठेवू नये.
पत्र्यांचे निरुपयोगी डबे चपटे करून ठेवावेत, शौचालयाच्या सेप्टिक टैंक नादुरुस्त असल्यास तो दुरुस्त करावा आणि व्हेंट पाइपला जाळी अथवा कापड बांधावे, कुलर व फ्रीज, पक्ष्याची पाण्याची भांडी, फुलदाण्या दर आठवड्याला साफ कराव्यात, इमारतीच्या गच्चीवरील भंगार, निकामी टायर रिकामे करावे, प्लास्टिकचे कप, बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावावी, परिसर नियमीत स्वच्छ ठेवावा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.