Dhule News : कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची वीजबिल थकल्याने आत्महत्या

Death News
Death Newsesakal
Updated on

न्याहळोद (जि. धुळे) : बँकेचे थकीत कर्ज व वीजबिलही (electricity bill) थकल्यामुळे येथील भारत (अमोल) चैत्राम पाटील (वय २६) या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक औषध प्राशन करून शेतातच आत्महत्या केली. (Indebted young farmer commits suicide due to exhaustion of electricity bill dhule news)

गेल्या पाच-सहा दिवसांपासून ट्रान्स्फॉर्मर बंद असल्याने वीज वितरण कंपनीकडून सूचना देण्यात आली होती. मात्र पैसे नसल्याने ते विजेचे बिल भरू शकले नाही. कपाशी विकल्यावर भरणा करू, अशी विनंतीही त्यांनी केली.

मात्र तरीही त्यांना तातडीने वीजबिल भरणा करण्यास सांगण्यात आले. त्यातच शेतातले कांदा पीक, मका उन्हाने करपू लागले होते. त्यामुळे निराश होऊन या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. बी. एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले भरत पाटील यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी फोटोग्राफीदेखील केली.

त्यांच्या शेतशिवारातील डीपीवरील वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. परिणामी, हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता बळावली. आधीच बँकेच्या कर्जामुळे वीजबिल भरण्यास थोडा अवधी मिळावा, यासाठी त्यांनी विनंती केली होती.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Death News
Unseasonal Rain : कांद्यासह गहू-हरभरा उद्‍ध्वस्त; शेतकरी हवालदिल!

दरम्यान, यापूर्वी येथील शेतकरी योगेश जाधव, प्रशांत अहिरे, बापू साखरे, मनोहर जिरे आदींनी फागणे येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊनदेखील त्यांचे ट्रान्स्फॉर्मर सुरू न झाल्याने कपाशीची विक्री झाल्यावर थकीत बिल भरणार असल्याचे भरत पाटील व संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले होते. तरीही ट्रान्स्फॉर्मर सुरू झाले नाही.

आधीच कर्जाचा वाढता डोंगर अन् त्यात वीज वितरण विभागाची कारवाई, यामुळे भरतचे मनोबत ढासळले व त्याने त्याच ट्रान्स्फॉर्मरजवळील कांद्याच्या शेतात आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात नेले.

तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, भरत पाटील यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून, शासनाने त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, वीज वितरण कंपनीनेही तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व कुटुंबीयांनी केली आहे.

"शासनाचे सर्वच अधिकारी असंवेदनशील पद्धतीने वागत असून, यामुळे शेतकरी व ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. भरत पाटील या शेतकऱ्याला वितरण कंपनीने तत्काळ मदत करायला हवी." -शरद पाटील, माजी आमदार, धुळे ग्रामीण

Death News
Unseasonal Rain : दोंडाईचात काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()