Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

Indefinite strike of Anganwadi sevika from today dhule news
Indefinite strike of Anganwadi sevika from today dhule newsesakal
Updated on

Anganwadi Sevika Strike : धुळे/नंदुरबार/जळगाव- राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या दोन लाख अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार (ता. ७)पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.(Indefinite strike of Anganwadi sevika from today dhule news)

यापूर्वी शासन, प्रशासनास निवेदन सादर केले आहे. तत्पूर्वी १ ते ६ डिसेंबर २०२३ फक्त आहारवाटपाशिवाय इतर कोणतीही कामे करणार नाहीत, असेही नमूद करण्यात आले होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन सोडवत नाही व सतत दुर्लक्ष केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे व आपल्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Indefinite strike of Anganwadi sevika from today dhule news
Chandrakant Patil on Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या मानधनाविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

त्यानुसार बेमुदत संप सुरू झाल्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही काम करू नये, तसेच पोषण ट्रॅकरमध्ये कोणतीही माहिती भरू नये. आपल्या योजनेच्या कामाबाबत कोणतीही माहिती वरिष्ठांना देण्यात येऊ नये.

कोणाच्याही दबावाला बळी न पडता संप यशस्वी करावा, असे आवाहन अध्यक्ष माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, संघटक सचिव अमोल बैस, राजू पाटील, लता गावित नयना मराते, राखी पाडवी, मनीषा मोरे, जयवंता पाटील, प्रियंका पाटील, रंजना बागले, रत्ना पगारे, पुष्पा दीक्षित, रेणुका कासार, कल्पना जकातदार, सुरेखा बोरसे आदींनी पत्रकान्वये कळविले आहे.

Indefinite strike of Anganwadi sevika from today dhule news
Anganwadi Sevika: मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश; मानधनात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.