शाकंभरी यात्रेत Indian Chocolateला पसंती! मंदाणेत यात्रेकरूंना आकर्षित करते लालेलाल गोडशेव

godshev
godshevesakal
Updated on

मंदाणे (जि. नाशिक) : येथील कृषिदैवत श्री अष्टभुजा शाकंभरी देवीच्या यात्रोत्सवात कृषी अवजारांसह ‘इंडियन चॉकलेट’ला राज्यासह परराज्यातील यात्रेकरू पसंती देत आहेत. इंडियन चॉकलेट म्हणजेच लालेलाल गोडशेवचे ढीग यात्रेकरूंना आकर्षित करीत आहेत. (Indian Chocolate preferred in Shakambhari Yatra red Godshev attracts pilgrims in Mandane nandurbar news)

मंदाणे (ता. शहादा) येथील कृषकांचे दैवत असणाऱ्या श्री अष्टभुजा शाकंभरी देवीचा यात्रोत्सव गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. या यात्रेचा ‘कृषी यात्रा’ म्हणून राज्यात लौकिक असल्याने यात्रेत कृषी अवजारांसह जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असतात.

त्यात कृषी अवजारांसह यात्रेकरू इंडियन चॉकलेट’ला दर वर्षी मोठी पसंती देतात. शाक-भाजी पुरविणाऱ्या या मातेच्या यात्रोत्सवातील गोडशेवचा गोडवा हा मोठा चविष्ट असल्याने प्रत्येक यात्रेत येणारा यात्रेकरू गोडव्याचा आस्वाद घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण झाल्याचे समाधान मानत नाही.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

godshev
Nashik News: कापूस, सूतदर घसरल्याने यंत्रमाग उद्योगाला पुन्हा झळाळी; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

नायलॉन गोडशेवला पसंती

बेसनपीठ, खवा, मैदा आणि प्युअर गुळाचा पाक यापासून ही इंडियन चॉकलेट तयार केली जाते. यात्रेत येणारे भाविक गरमागरम गोडशेवचा आस्वाद यात्रेत घेतात व बाहेरगावी राज्यात, परराज्यात तसेच परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या आपल्या नातेवाईक, आप्तेष्टांना पॅकिंग करून सोबत नेत असतात.

त्यात नायलॉन गोडशेवला अधिक मागणी असते. ती पिवळसर, पांढऱ्या रंगाची जास्त गोडवा नसणारी व मधुमेह रुग्णांनाही खाण्यास योग्य असल्याने या प्रकारच्या गोडशेवला नागरिक अधिक पसंती देत आहेत. या नायलॉन गोडशेवची किंमत २०० रुपये असून, साध्या गोडशेवची किंमत १५० रुपये एवढी आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

godshev
रेल्वे स्टेशनवर बॉम्ब अन् प्रवाशांची बोंबाबोंब! मनमाडला Mockdrill, तब्बल सव्वातास धुमश्चक्री

मोठी उलाढाल

या यात्रेत स्थानिक नागरिक मोठ्या आवडीने इंडियन चॉकलेटचा आस्वाद घेत असतात. विशेष म्हणजे मंदाणेसह परिसरातील गाव-पाड्यांतील मजूर कामानिमित्त मंदाणे येथे आल्यास सकाळी नाश्‍त्याला ते सायंकाळी जेवणालाही गोडशेवची खरेदी करीत आहेत.

यामुळे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत केवळ गोडशेवच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे दुष्काळी परिस्थिती उद्‌भवली असल्याने वस्तू महाग झाल्या असल्या तरीही २०० ते १५० रुपये किलो दराने मिळणाऱ्या या गोडशेवची मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू खरेदी करताना दिसत आहेत.

"कोरोनामुळे दुष्काळी परिस्थिती असूनदेखील दर वर्षीप्रमाणे या वर्षीही शाक-भाजीला स्वाद देणाऱ्या या शाकंभरी मातेच्या यात्रोत्सवात यात्रेकरू गोडशेवला पसंती देत आहेत. स्वतःसाठी व नातेवाइकांसाठी गोडशेव खरेदी करीत आहेत."- श्री. चव्हाण बंधू (गोडशेव व्यावसायिक, खेतिया)

"मंदाणे यात्रेची आम्ही खास वाट पाहत असतो. या यात्रेत आम्हाला वर्षातून एकदा प्रसिद्ध असलेल्या इंडियन चॉकलेटचा आस्वाद घेता येतो. आम्ही संपूर्ण परिवारातील सदस्यही आस्वाद घेतो आणि आमच्या बाहेरगावी, परराज्यात राहणाऱ्या नातेवाइकांनादेखील पाठवत असतो."

-श्री. नितीनशेठ (संचालक, श्री दुर्गा खांडसरी, मेंद्राना, मध्य प्रदेश)

godshev
Nashik News : द्राक्षांचे यंदा 3 वर्षांच्या तुलनेत 20 टक्के अधिक उत्पादन; फेब्रुवारीपासून हंगाम रुळावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.