Dengue Disease : एका रुग्णाला आयुष्यात 4 वेळा होऊ शकतो डेंगी; समज-गैरसमजाविषयी वाचा सविस्तर

 information about dengue disease dhule news
information about dengue disease dhule newsesakal
Updated on

Dengue Disease : शहरासह जिल्ह्यात डेंगीने डोके वर काढले आहे. यात डेंगीचा आजार आणि प्लेटलेट्स याविषयी समाजात समज-गैरसमज आहेत.

त्याविषयी प्रबोधनात्मक, जनजागृतीपर ऊहापोह करताना डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या रक्ताची तपासणी होते, यात आरटीपीसीआर किंवा एनएस १ (अँटिजेन) चाचणी पॉझिटिव्ह आली तर डेंगीचे निदान करता येते, अशी माहिती श्री सिद्धश्‍वर हॉस्पिटलचे कन्सल्टिंग फिजिशियन डॉ. संजय संघवी यांनी दिली. (information about dengue disease dhule news)

डेंगी आणि प्लेटलेट्स याविषयी डॉ. संघवी यांनी काही अनुभनकथनही केले. ते असे ः

प्रसंग १ ः एक तरुण मुलगा नुकताच माझ्याकडे डेंगीमुळे ॲडमिट होता. खूप ताप होता. प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब व तापाचे प्रमाण, इतर लक्षणांप्रमाणे उपचार सुरू होते.

त्या वेळी वॉर्डमध्ये त्याचे नातेवाईक खूप बडबड करत होते. आमचा रुग्ण गंभीर असूनही त्याला कुठलेही हायर अँटिबायोटिक दिलेले नाही. त्या नातेवाइकांना बोलावून समजावून सांगितले की त्याला अँटिबायोटिकची गरज नाही.

प्रसंग २ ः डेंग्यूचा रुग्ण ः पहिल्या दिवशी प्लेटलेट्स एक लाख ७० हजार, दुसऱ्या दिवशी एक लाख ४० हजार, तिसऱ्या दिवशी ९० हजार, चौथ्या दिवशी ५५ हजार... रुग्णाच्या नातेवाइकांचा प्रश्न होता की रुग्णालयात दाखल केल्यानंतरही प्लेटलेट्‌स इतक्या कमी होत आहेत... मग डॉक्टर तुम्ही काय करतात? काही उपचार का करत नाही?

प्रसंग ३ ःप्लेटलेट्स दोन लाख १५ हजारांवरून ५५ हजारांनी एकदम कमी होऊन एक लाख ६० हजार झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला खूप टेन्शन आले आहे. प्रसंग ४ ः दाखल केल्यानंतर चौथ्या दिवशी रुग्णाची तब्येत अचानक खालावली. बीपी कमी झाला. छातीत पाणी झाले. त्याला तत्काळ आयसीयूत न्यावे लागले. त्याची तब्येत खालावली म्हणजे डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले आहे.

प्रसंग ५ ः प्लेटलेट्स ५० हजारांवरून १८ हजार झाल्या. जर डॉक्टरांनी आधीच प्लेटलेट्स दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती. डॉक्टरांनी उशीर केला आहे.

 information about dengue disease dhule news
Dengue Home Remedies : डेंग्यूच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ, शरीरात विषाणू दुप्पट वाढतील

डेंगीचे चार विषाणू

डेंगी हा आजार डेंगी व्हायरस या फ्लावी व्हायरस गटातील विषाणूमुळे होतो. हा विषाणू एडिस इजिप्ती या डासाच्या चाव्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतो. डेंगी व्हायरसचे चार सिरो टाईप्स आहेत. DEN १, DEN २, DEN ३, DEN ४.

जर यातल्या एकामुळे डेंगी झाला तर ज्या संरक्षक अँटिबॉडीज तयार होतात, आयुष्यभर त्या रुग्णाचे त्या सिरो टाईपपासून संरक्षण करतात; परंतु दुसऱ्या सिरो टाईपमुळे त्याला डेंगी पुन्हा होऊ शकतो. त्यामुळे एका रुग्णाला आयुष्यात चार वेळा डेंगी होऊ शकतो. डेंगीचा डास चावल्यानंतर सरासरी पाच ते सात दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.

आजाराची लक्षणे

डेंगीच्या आजाराच्या तीन अवस्था असतात. पहिली अवस्था तापाची, दुसरी अवस्था गंभीर गुंतागुंत होण्याची, तर तिसरी अवस्था हळूहळू सुधारणा होण्याची असते. पहिल्या अवस्थेतील लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी, हाडे दुखणे, सांधे दुखणे, स्नायू दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, शरीरावर पुरळ येणे, थकवा, अशक्तपणा, बारीक बारीक रक्तस्राव होणे व यात नाकातून रक्तस्राव होणे.

दुसऱ्या अवस्थेतील लक्षणांमध्ये रुग्णात गंभीर लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. रक्तदाब कमी होणे, फुफ्फुसात किंवा पोटात पाणी जमा होणे. याच वेळी भान हरपणे, यकृताला सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होते.

 information about dengue disease dhule news
Dengue : दुसऱ्यांदा डेंग्यू होणे जास्त धोकादायक, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. सलाइन आणि इतर सपोर्टिव्ह (फक्त आधार) उपचारांचा योग्य वापर या वेळी अतिशय कुशलतेने करावा लागतो. ही धोक्याची अवस्था ओलांडलेल्या रुग्णाच्या प्रकृतीत नंतर हळूहळू सुधारणा होते. थकवा आणि अशक्तपणा बरेच दिवस राहू शकतो, असे डॉ. संघवी यांनी नमूद केले. (क्रमशः)

आरटीपीसीआर चाचणी अचूक, पण...

नुकताच डेंगी होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आयजीएम ही चाचणी पॉझिटिव्ह दिसते आणि ती ॲन्टिबॉडी चाचणी असल्याने ती दोन ते तीन महिने पॉझिटिव्ह दिसू शकते. डेंगी सोडून इतर फ्लावी व्हायरस विषाणूंमध्येही या चाचण्या पॉझिटिव्ह दिसू शकतात आणि डेंगीचे निदान चुकू शकते.

आरटीपीसीआर ही जरी जास्त अचूक चाचणी असली तरी ती महागडी आहे आणि लवकर उपलब्ध होत नाही. शिवाय डेंगीच्या रुग्णांमध्ये इतर काही गुंतागुंत (कॉम्प्लिकेशन) झाले आहेत किंवा नाही हे बघण्यासाठी इतर तपासण्या कराव्या लागतात, असेही डॉ. संघवी यांनी सांगितले.

 information about dengue disease dhule news
Dengue Fever in Children: लहान मुलांमध्ये डेंग्यूची झपाट्याने वाढ, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.