धुळे : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणेस्थित राष्ट्रीय (National) आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे शहरालगत नकाणे तलावात पूरस्थितीतील शोध व
बचावकार्याबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. (Initiative of District Disaster Management Authority with District Collector Search rescue training in flood situations dhule news)
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे निर्देश आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम झाली. अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड, महसूल, शिक्षण विभाग, वीज वितरण कंपनी, भारत दूरसंचार निगम, जिल्हा रुग्णालय व इतर विभागांच्या समन्वयातून ही रंगीत तालीम यशस्वी करण्यात आली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक सुजितकुमार पासवान, अजयकुमार यादव, अंकितकुमार यादव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत पारस्कर, पोलिस निरीक्षक मनोज मोहोळ,
दिलीप मांडळ, श्री. सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक जगताप, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वट्टेवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेत आपत्ती काळात महत्त्वाची भूमिका असलेल्या विविध विभागांची टेबल टॉप एक्झरसाइज बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, श्री. पासवान, श्री. यादव, श्री. मांडळ, विजय गावंडे, आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी सोनवणे, होमगार्डचे मंगल पाटील, दिनेश मराठे, राज्य वीज वितरण कंपनीचे जितेंद्रकुमार इंगळे, शिक्षण विभागाचे मधुकर पाटील, पाटबंधारे विभागाचे नीलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला पाटील, दूरसंचार निगमचे ए. ए. शिंदे आदींसह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित या काळात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. आपत्ती काळात विविध यंत्रणा काम करीत असतात. आपत्ती व्यवस्थापन करताना विभागांकडून काही उणिवा राहतात. यावर सविस्तर चर्चेसाठी टेबल टॉप एक्झरसाइजचे आयोजन केले जाते. आपत्तीचा सामना करताना अडचणी येऊ नयेत यासाठी वेळोवेळी रंगीत तालमीचे आयोजन केले जाते.
सुजितकुमार यांनी आपत्ती काळात प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोठी हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पाच अधिकारी व वीस जवानांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले, असे निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.