Dhule News : शाळा-महाविद्यालयात पोलिसांकडून पाहणी; टवाळखोरांना तंबी

Z. B. Police Inspector Satish Ghotekar making a surprise visit to Patil College and questioning the youth in the premises.
Z. B. Police Inspector Satish Ghotekar making a surprise visit to Patil College and questioning the youth in the premises.esakal
Updated on

Dhule News : शहरातील शाळा-महाविद्यालय व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांनी शुक्रवारी हजेरी घेतली. काही टवाळखोरांना ताब्यात घेतले, नंतर त्यांना ताकीद देऊन सोडले.(Inspection by police in schools colleges dhule news)

देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी पथकासह देवपूर भागातील झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या आवारात पाहणी करून काहींची चौकशी केली. पेट्रोलिंग करत काही टवाळखोरांना ताब्यातही घेतले. पोलिसांना पाहून काही जणांनी तेथून पळ काढला. पोलिसांच्या या अचानक भेटीचे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी स्वागत केले.

शहरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण घिरट्या घालणाऱ्या टवाळखोरांचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रकारही होतात, याबाबत देवपूर पोलिसांना तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावरून शुक्रवारी सकाळी पोलिस निरीक्षक घोटेकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह झेड. बी. पाटील महाविद्यालयाला अचानक भेट दिली.

Z. B. Police Inspector Satish Ghotekar making a surprise visit to Patil College and questioning the youth in the premises.
Dhule News : टॉवर गार्डनचे रखडलेले काम लवकरच होणार : अनुप अग्रवाल

या वेळी महाविद्यालयाशी संबंध नसलेले काही तरुण तेथे आढळले. त्यातील काहींना ताब्यात घेतले. तसेच काहींना ताकीद देऊन सोडण्यात आले. याबरोबरच कॉलेज कॅम्पसची पाहणी केली. त्यादरम्यानही काही टवाळखोरांना ताब्यात घेतले.

ओळखपत्राशिवाय प्रवेश नको

शैक्षणिक संस्थांनी टवाळखोरांना शाळा-महाविद्यालयात किंवा आवारात प्रवेश देऊ नये. ओळखपत्र, ड्रेसकोड नसेल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देऊ नये, अशी सक्त ताकीद सुरक्षारक्षकांना द्यावी, अशा सूचना पोलिस निरीक्षक घोटेकर यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिल्या. विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रकार दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले.

Z. B. Police Inspector Satish Ghotekar making a surprise visit to Patil College and questioning the youth in the premises.
Dhule News : कामावर उशिरा आलेल्या 10 लेट लतिफांना ‘दणका’; यांच्याकडून शिस्तीचा परिपाठएसपी धिवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.