Dhule Pre Mansoon Inspection : मॉन्सूनपूर्व जलस्रोतांची तपासणी; 30 जूनपर्यंत अभियान

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission esakal
Updated on

Dhule Pre Mansoon Inspection : यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे.

या अभियानात जिल्ह्यातील दोन हजार ८३७ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. ३० जून २०२३ पर्यंत हे अभियान पूर्ण करायचे आहे. (Inspection of pre monsoon water sources in Dhule district news)

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणी ३० जूनपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे.

याअंतर्गत पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणी पुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळजोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने गुणवत्ता पोर्टलवर युआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करायचे आहेत.

सदर पाणी गुणवत्ता तपासणी अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हे या संनियंत्रण करत आहेत. पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवताना कॅनवर पाणी नमुन्याचा पाणी गुणवत्ता पोर्टलवरील नोंदीचा संकेतांक असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission
Ashadhi Wari 2023 : आम्ही पंढरीचे वारकरी वारी चुको नेदी हरी..! दिंडीचे कापडणेत स्वागत

रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने घेताना मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या स्रोतांतून व योजना नसल्यास पिण्याच्या पाण्याच्या वापरात असलेल्या स्रोतांमधून घ्यायचे आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जलसुरक्षक व आरोग्यसेवक यांनी संयुक्तपणे पाणी नमुने गोळा करणे व सदर पाणी नमुने आयडीसह जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत.

सक्रिय सहभागाचे आवाहन

या अभियानात ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. ए. बोटे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रदीप पवार यांनी केले आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट असे

धुळे.............५९०

साक्री..........१०६६

शिरपूर...........७७२

शिंदखेडा.........४०९

एकूण...........२८३७

Jal Jeevan Mission
Nandurbar Water Cut : मुख्य जलवाहिनी फुटल्याने येथे बंद राहील पाणीपुरवठा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.