धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२- २०२३ मध्ये सहभागाची शेवटची मुदत ३१ जुलै २०२२ असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. (Insurance coverage for soybean in thousand rupees Dhule Latest Marathi News)
केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri pikvima yojana) अंमलबजावणी यंत्रणा म्हणून वर्षासाठी आयसीआयसीआय (ICICI) लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२२ व रब्बी हंगाम २०२२- २०२३ या हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (८० : ११०) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक कंपन्यांमार्फत एका वर्षाकरीता राबविण्यात येईल.
विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपर्यंतचे दायीत्व स्वीकारतील.
मात्र, एका वर्षातील देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम, जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ११० टक्क्यांपेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारेल आणि जर पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल, तर कंपनी विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल.
विमा संरक्षित रकमेची माहिती अशी (अनुक्रमे खरीप हंगाम पीक, विमा संरक्षित रक्कम हेक्टरमध्ये, शेतकऱ्यांनी भरावयाची हेक्टरी विमा हप्ता रक्कम रुपयांत या क्रमाने) : बाजरा, २७५००, ५५०. कपाशी, ५००००, २५००. भुईमूग, ३७५००, ७५०. ज्वारी, ३२५००, ६५०. मका, ३५५९८, ७१२. मूग, २२५००, ४५०. कांदा, ७००००, ३५००. भात, ४००००, ८००. नागली, २००००, ४०० तीळ, २५०००, ५००. सोयाबीन, ५००००, १०००. तूर, ३६८०२, ७३६. उडीद, २२५००, ४०. पीक विम्यासाठी अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.