Dhule News : घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला अटक

crime news
crime newsesakal
Updated on

नंदुरबार : तळवे (ता. तळोदा) येथील बंद घराचे कुलूप (Lock) तोडून घरातील दागिने लांबविणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Interstate Criminal arrested arrested for burglarizing houses dhule news)

त्याला अटक करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तळवे येथील नारायण जगन्नाथ गायकवाड यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कडीकोयंड्यासह तोडून अज्ञात चोरट्यांनी ८६ हजार ४५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने नेले होते.

याबाबत श्री. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.ग्रामीण भागात झालेल्या घरफोडीमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. तळोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडित सोनवणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांना तत्काळ कळविले होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

crime news
Dhule News : निमगूळ येथे कत्तलखान्याकडे गायी वाहून नेणारी वाहने जप्त

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तळोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडित सोनणे यांना गुन्हा तपासाचे आदेशित केले.

तपास सुरू असताना २० फेब्रुवारीला अक्कलकुवा गावातील सोरापाडा परिसरात राहणारा शिकलीकर तरुण अक्कलकुवा गावातील मोलगी नाका परिसरात सोन्याची लगड व चांदीचे काही दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांना मिळाली. ही माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली.

त्यांनी तत्काळ पथक पाठवून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने दर्पणसिंग धरमसिंग शिकलीकर (वय २२, रा. सोरापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सोन्याची लगड व चांदीचे दागिने मिळून आले. त्याला दागिन्यांबाबत विचारपूस केली असता तळवे येथील घरफोडीचा उलगडा झाला. त्याच्याकडून एक लाख ६२ हजार ९१८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

crime news
Ecofriendly Experiment : शेणापासून लाकडासारखे सरपन; पर्यावरणपूरक प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.