BJP News : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस; नव्या-जुन्या चेहऱ्यांमध्ये रस्सीखेच

bjp
bjpesakal
Updated on

Dhule News : भाजपच्या येथील ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी राम पॅलेसमधील खासदार संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.

यात नव्या- जुन्या चेहऱ्यांमध्ये रस्सीखेच आणि जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. (Interview of aspirants for post of rural district president of BJP were held here dhule news)

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा व जिल्हा पक्षीय निरीक्षक स्मिता वाघ यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करतील आणि २० मेनंतर ग्रामीण जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर होईल.

प्रदेश उपाध्यक्षा वाघ यांचे खासदार डॉ. सुभाष भामरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्‍विनी पवार, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती महावीरसिंह रावल, संजीवनी शिसोदे, पावरा, साक्रीच्या नगराध्यक्षांसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पदासाठी इच्छुक उमेदवार

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तर नव्या चेहऱ्यांमध्ये माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, माजी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, ॲड. गजेंद्र भोसले इच्छुक आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bjp
ZP Employees Transfer : जि. प.च्या बदल्यांना भरतीमुळे विलंब; बदली वेळापत्रकातही बदल

त्यांच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा निरीक्षक वाघ यांनी स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या. याविषयी वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला जाईल आणि २० मेनंतर जिल्हाध्यक्षपदासाठी निवड जाहीर होईल, असे भाजपतर्फे सांगण्यात आले. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी दिली जावी, रिपिटेशन नको, अशी मागणी काही कार्यकर्ते, इच्छुकांकडून झाली.

शहर-जिल्हाध्यक्षांची निवड

प्रदेश उपाध्यक्ष वाघ या शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार होत्या. मात्र, संबंधित इच्छुक भाजपच्या कर्नाटक येथील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्याने मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नगरसेवक हिरामण गवळी, शीतल नवले, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदीप कर्पे, कमलाकर अहिरराव, गजेंद्र अंपळकर, शशी मोगलाईकर, दिनेश बागूल यांच्यासह आणखी काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.

bjp
Dhule News : मेंदीच्या कार्यक्रमाची वेगळी क्रेझ; प्रतिष्ठेपायी लग्नकार्याचा वाढतोय खर्च...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()