धुळे : शहरातील नटराज टॉकीज परिसरामधील घरात हातसफाई (Robbery) करणारा चोरटा आझादनगर पोलिस ठाण्याच्या तावडीत सापडला.
त्याला मालेगाव येथून पोलिस पथकाने ताब्यात घेतले. या संशयिताकडून लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (investigation team seized material worth lakhs from thief in robbery case dhule crime news)
शहरातील नटराज चित्रपटगृहामागील नित्यानंदनगरात अश्विनी सुहास लळीत यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यासह परिसरातील बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले. त्यांनी १६ मार्चला मध्यरात्री पाऊण ते पहाटे चारच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. यात २५ हजार किमतीचा एलईडी टीव्ही, दोन हजार चारशे किमतीच्या पितळी, तांब्याच्या मूर्ती, चांदीच्या पादुका असा ऐवज नेला. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तपास मालेगावकडे
आझादनगरचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील आणि तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार संशयितांचा शोध सुरू केला. तपासाची दिशा मालेगावकडे सरकली. तेथील अकरा हजार खोली भागातील इम्रान रफिक शेख याने घरफोडी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने आझादनगरचे पथक मालेगावला पोचले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
संशयित इम्रान शेख याला मालेगाव पोलिसांच्या मदतीने आझादनगर पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५, डीडी १७९०) ताब्यात घेतली. याप्रमाणे पोलिस पथकाने एक लाख सात हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ठिकठिकाणी गुन्हे
संशयित शेख याच्याविरुद्ध धुळे आणि मालेगाव येथे चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगरचे निरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार आरिफ सय्यद, प्रकाश माळी, योगेश शिरसाट, संदीप कढरे, चंद्रकांत पाटील, राजू ढिसले, आतिक शेख, सुशील शेंडे, अजहर शेख, शोएब बेग, संतोष घुगे, सिद्धांत मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.