Dhule Crime News : लोखंडी साहित्य चोरटे वाहनांसह ताब्यात

crime
crime esakal
Updated on

Dhule Crime News : बोलेरो पिक-अप वाहनातून लोखंडी साहित्य चोरी करून घेऊन जाणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, वाहनांसह अकरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

दोंडाईचा पोलिस रात्री गस्तीवर असताना बाह्मणे (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात दाऊळ रस्त्यावरून शनिवारी (ता. ११) पहाटे चारच्या सुमारास बोलेरो पिक-अपमधून लोखंडी प्लेटांसह लोखंडी साहित्य चोरी करून घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई केली. (Iron material seized along with stolen vehicles in dhule crime news )

दरम्यान, चोरीचा माल घेऊन जाणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत अकरा लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस शिपाई नीलेश मोतीलाल धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रात्री गस्त घालत असताना बाह्मणे (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात दाऊळ रस्त्यावर पहाटे चारच्या सुमारास संशयित वाहनास थांबविले.

चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शंकर विजय सदाराव (वय २२, रा. झोतवाडे, ता. शिंदखेडा) असल्याचे सांगितले. वाहनात त्याच्यासोबत मोनूशेख हुसेन (२३), कुंदन पौलाद सोनवणे (२४), किरण ईश्वरलाल पाटील (२५, सर्व रा. डालडा घरकुल, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांचा सहभाग होता.

crime
Dhule Crime News : पोकलेनसह शेकडो ब्रास वाळूसाठाही गायब! वाळूघाटाचा ताबा पुन्हा महसूलकडे

वाहनात मागे लोखंडी प्लेट व लोखंडी चैनल आढळले. विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लोखंडी माल चोरी करून आणण्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस ठाण्यात वरील चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यात दहा लाख रुपये किमतीची पिक-अप (एमएच १२, एलटी २५८१), तीस हजार रुपये याप्रमाणे दोन लोखंडी प्लेट, पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीन नग ४५ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल असा एकूण ११ लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे तपास करीत आहेत.

crime
Dhule Crime News : 5 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.