Jagannath Rath Yatra 2023 : शहादा नगरीत जगन्नाथांची भव्य शोभायात्रा!

Devotees participating in the Rath Yatra of Lord Shri Jagannath
Devotees participating in the Rath Yatra of Lord Shri Jagannath esakal
Updated on

Jagannath Rath Yatra 2023 : श्रीनारायण भक्ती पंथातर्फे भगवान श्रीजगन्नाथ यांची भव्य रथयात्रा काढण्यात आली.

रथयात्रेवर फुलांची उधळण, ढोल-ताशा आणि हरिनामाच्या गजरात महिलांच्या गरबा नृत्यात निघालेल्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेने शहादेकरांचे लक्ष वेधून घेतले. (jagannath rath yatra 2023 Grand procession of Jagannath in Shahada city nandurbar news)

भगवान श्रीजगन्नाथजी यांच्या विशाल रथ यात्रेचे आयोजन आषाढ - मासच्या शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी या दिवशी जगन्नाथपुरी येथे केले जाते. या तिथीचे औचित्य साधून शहादा नगरीत श्रीनारायण भक्ती पंथाचे प्रवर्तक संतश्री लोकेशानंद महाराज यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या चार वर्षांपासून भगवान श्रीजगन्नाथजी यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात येते.

या रथयात्रेच्या आनुषंगाने भाविकांना भगवान श्रीजगन्नाथजी यांच्या दिव्य स्वरूपाच्या अनुभूतीचे दर्शन होते. मंगळवारी (ता. २०) देखील श्रीनारायण भक्ती पंथातर्फे भगवान श्रीजगन्नाथ यांच्याची भव्य रथयात्रा शहादा नगरीतून काढण्यात आली. भगवान श्रीजगन्नाथजी यांच्या सुशोभित रथाला भाविकांनी ओढण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Devotees participating in the Rath Yatra of Lord Shri Jagannath
Jagannath Rathotsav: जगन्नाथ रथयात्रेत हजारो भाविकांची मांदियाळी! ठिकठिकाणी सडा रांगोळीने स्वागत

या रथावर संतश्री लोकेशनंद महाराजदेखील विराजमान झाले होते. रथयात्रेस सकाळी नऊला सप्तशृंगी माता मंदिर येथून प्रारंभ होऊन दोंडाईचा रोड, बसस्थानक, डोंगरगाव रोड मार्गावरून रथयात्रा नेण्यात आली. रथयात्रेदरम्यान जागोजागी फुलांची उधळण करण्यात येत होती. हरिनामाचा गजर केला जात होता. ढोलपथकाद्वारे महिलांचे गरबानृत्यदेखील लक्ष वेधून घेत होते. जागोजागी प्रसादाचे वाटपही केले जात होते.

दादावाडीजवळ रथयात्रेचा समारोप झाला. रथयात्रा यशस्वी करण्यासाठी श्री नारायण भक्ती पंथाचे शांतिलाल पाटील, जगदीश पाटील, सुभाषअण्णा पाटील, अशोक पाटील, विशाल गारोळे, डॉक्टर योगेश चौधरी, पल्लवी प्रकाशकर यांच्यासह नारायण भक्ती पंथाच्या भक्तगणांनी प्रयत्न केले. रथयात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते.

Devotees participating in the Rath Yatra of Lord Shri Jagannath
Jagannath Rath Yatra 2023 : ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात रथयात्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.