धक्कादायक...आईची पाठ फिरताच बालिका दारातून बेपत्ता !

धक्कादायक...आईची पाठ फिरताच बालिका दारातून बेपत्ता !
Updated on

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील अरशीन बी साबीर शहा (वय-4) ही चिमुरडी घरुन बेपत्ता झाली होती. सकाळी साडेदहा वाजेपासून बेपत्ता चिमुकलीचा तीन तासाच्या शोधाशोधनंतर या परिसरातील एका जिन्याजवळ मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी घडली. मृतावस्थेत सापडलेली चिमुकलीच्या नाकातून, कानातून पाणी पडत होते, तर तोंडातून फेस आला होता. त्यामुळे पाण्यात बुडून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्‍यता होत आहे. मात्र नातेवाईकांसह समाजबांधवांनी अत्याचार झाल्याच्या शंका व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनानंतर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. 


मशीदीतून उदघोषणा 
पिंप्राळा हुडको परिसरात साबीर शहा हबीबशहा हे पत्नीसह कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना अरशीन बी हे एकुलती एक चिमुकली होती. बांधकाम साईटवर ते मजुरी करुन त्याचा उदरनिर्वाह भागवितात. परिसरात खेळत असतांना सकाळी 10 अरशीन बी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. आई फरजाना हिने परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली. मात्र चिमुकलीचा शोध लागला नाही. यानंतर या परिसरात असलेल्या सुन्नी कादरी या मशीदीवरील लाऊडस्पीकरवरुन अरशीन बी बेपत्ता झाल्याबाबत सुचना देण्यात आली. यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास याच परिसरात बिल्डींग ए, रुम नं 59 या इमारतीच्या जिन्याजवळ सुहाना नावाच्या मुलीला तिचा मृतदेह दिसला. 

हेपण पहा : व्हॅलेंटाईनची चॉकलेट घेवून गेली तुरूंगात 

शवविच्छेदनात नेमके कारण स्पष्ट 
मृतदेह आढळून आल्यानंतर सद्दाम खान अब्दुल खान यांच्यासह तरुणांनी तातडीने रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केल्यानंतर तिला पुन्हा घरी नेण्यात आले. समाजबांधवांना अरशीनच्या मृत्यूबद्दल शंका आली. अत्याचारातून तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर या परिसरातील माजी नगरसेवक राजू पटेल यांच्यासह शेख हुसेन शे बलदार, कुतबुद्दीन अजीज शहा, हरुन हुसने खॉ यांनी नेमका मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत माहिती मिळावी म्हणून मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणला. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे विश्‍वनाथ गायकवाड, संभाजी पाटील यांनी घटनास्थळ गाठून माहिती जाणून घेतली. जिन्याजवळ कुठल्याही प्रकारचे पाणी असलेला खड्डा अथवा तळे नाही अशी माहिती समोर आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा रूग्णालय गाठले. याठिकाणी मृतदेहाची पाहणी केली. पाण्यात बुडूनच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर नेमके कारण समोर येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.