School First Day : विद्यार्थ्यांचे होणार जंगी स्वागत! 35 हजार 958 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरणाचे नियोजन

School First Day : पहिल्या दिवशी मुलांचे जंगी स्वागत करून, पाठ्यपुस्तक देऊन शाळेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी शाळा प्रशासन सज्ज झाले आहे.
Group Education Officer Ramesh Chaure, Extension Officer Desle, Principal Manoj Patil during the distribution of textbooks.
Group Education Officer Ramesh Chaure, Extension Officer Desle, Principal Manoj Patil during the distribution of textbooks.esakal
Updated on

School First Day : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ शनिवार (ता. १५)पासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी मुलांचे जंगी स्वागत करून, पाठ्यपुस्तक देऊन शाळेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी शाळा प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्याच दिवशी तालुक्यातील ३५७ शाळांतील पहिली ते आठवीच्या ३५ हजार ९५८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (Planning of textbook distribution to 35 thousand 958 students )

नवापूर तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळा व अनुदानित माध्यमिक शाळा अशा एकूण ३५७ शाळांमध्ये पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. ३५ हजार ९५८ पुस्तक संचांची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविण्यात आली होती. मराठी माध्यमाच्या ३४०, ऊर्दू माध्यमाच्या पाच, इंग्रजीच्या एक व गुजराती माध्यमाच्या ११ शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण परिषदेकडून नवापूर पंचायत समितीला पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली होती.

त्यांचे वाटप तालुक्यातील १९ केंद्रशाळा असलेले नवापूर, खांडबारा, चिंचपाडा, विसरवाडी, कडवान, अंजने, उमरान, रायगड, रायंगन, रायपूर, धनराट, कोळदा, बोरपाडा, निमदर्डे, श्रावणी, भादवड, पळशी, करंजी, खेकडा या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी प्रत्येक मुख्याध्यापकांना वाटप केले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने मुख्याध्यापक आपापल्या शाळेत पाठ्यपुस्तक वाटप करणार आहेत.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा

नवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५३ शाळा आहेत. पंधरा दिवसांपूर्वी वादळी वारा आला होता. त्यात पाच-सात शाळांच्या वर्गखोल्यांचे पत्रे उडाले होते. ग्रामपंचायत व लोकसहभागूत छतांची दुरुस्ती करून घेतली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांची दुरुस्ती, डागडुजी केली आहे. तालुक्यात शंभर टक्के शाळा इमारती असल्या तरी अजून दहा ते पंधरा शाळांमध्ये वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यांचे बांधकाम करणे गरजेचे आहे.

पदे रिक्त

तालुक्यात जिल्हा परिषदच्या २५३ शाळांमधील शिक्षकांची ५७९ पदे मंजूर आहेत. पैकी ५३४ शिक्षक कार्यरत आहेत. ४५ पदे रिक्त आहेत. ४५ पदवीधर शिक्षक आहेत. विषय शिक्षकांची ४० पदे मंजूर आहेत. पैकी १९ रिक्त आहेत. २१ विषय शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थिसंख्या पाहता तालुक्यात मुख्याध्यापकांची नऊ पदे मंजूर आहेत पैकी सात कार्यरत आहेत. (latest marathi news)

Group Education Officer Ramesh Chaure, Extension Officer Desle, Principal Manoj Patil during the distribution of textbooks.
School First Day : धम्माल ‘मस्ती की पाठशाला’नंतर आजपासून ‘स्कूल चले हम’; भुसावळ तालुक्यात प्रवेशोत्सवाची उत्सुकता

कुणाचीही बदली

तालुक्यातील शिक्षक बदल्यांबाबत मागणी नाही. सद्यःस्थिती पाहता आताच लोकसभा निवडणूक झाली. आचारसंहिता होती त्यामुळे शिक्षक बदल्यांचा विषय आला नाही. तशीही कुणाचीही मागणी नाही.

मुलांचे शाळाप्रवेश स्वागत :

शनिवारपासून सर्वत्र शाळा सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी आपापल्या परीने व स्थानिक लोकप्रतिनिधी, लोकसहभाग घेऊन नियोजन केले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करण्यात येणार आहे.

यात शिक्षकांचे चारचाकी वाहन, बैलगाडी यांचा समावेश आहे. शाळा सजावट, रांगोळी, फुले, वाजंत्री, ढोल-ताशे यांचे नियोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे निश्चितपणे शाळेतील उपस्थिती टिकून राहण्यास मदत होणार आहे.

Group Education Officer Ramesh Chaure, Extension Officer Desle, Principal Manoj Patil during the distribution of textbooks.
School First Day : अमळनेर तालुक्यातील शाळांना मिळाल्या नवीन खोल्या; काही गावांत कामे सुरू

माध्यमनिहाय विद्यार्थिसंख्या

मराठी - ३३ हजार ९१७

इंग्रजी - ३८२

उर्दू - १८१

गुजराती- एक हजार ४७८

वर्गनिहाय विद्यार्थि संख्या

पहिली- ३,८१४

दुसरी - ३,८२१

तिसरी - ३,८१५

चौथी - ३,७५२

पाचवी - ३,९७१

सहावी- ४,१३१

सातवी - ४,१२४

आठवी - ४,४२८

''नवापूर तालुक्यातील प्राथमिक व अनुदानित माध्यमिक अशा एकूण ३५७ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे नियोजन आहे.''-आर. बी. चौरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नवापूर

''प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुपस्थिती व गळतीचे प्रमाण कमी होऊन १०० टक्के उपस्थिती वर्गामध्ये राहण्याच्या दृष्टीने शासनातर्फे समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके पुरविली जातात. त्याचा लाभ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे.''-रमेश देसले, शिक्षण विस्ताराधिकारी, नवापूर

Group Education Officer Ramesh Chaure, Extension Officer Desle, Principal Manoj Patil during the distribution of textbooks.
School First Day : शाळांमध्ये आज प्रवेशोत्‍सव; ढोलताशांच्‍या गजरात विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()