Dhule News : बसखाली उडी घेऊन जवानाची आत्महत्या

Death News
Death Newsesakal
Updated on

Dhule News : त्रिपुरा राज्यातील सीआरपीएफ बटालियनमधील जवानाने शहरातील बसस्थानकाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली आत्महत्या केली. अमृत कारभारी शेवाळे (वय ४९, रा. देऊर बुद्रुक, ता. धुळे, ह.मु. सद्‍गुरू कॉलनी, वडेल रोड, देवपूर, धुळे) असे मृत जवानाचे आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगाराची जळगाव-नाशिक बस (एमएच २०, बीएल ३१५१)चे चालक राकेश विठ्ठल कोळपे यांनी धुळे शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता. २२) ते जळगाव येथून नाशिकला जाण्यासाठी बसने धुळ्यात पोचले. (jawan committed suicide by jumping under bus dhule news)

धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री सव्वाआठच्या सुमारास बस नाशिककडे मार्गस्थ होण्यासाठी निघाली. त्या वेळी एका अनोळखी व्यक्तीने बसच्या डाव्या बाजूच्या मागील चाकात अचानक उडी घेतली. संबंधित व्यक्ती चाकाखाली दाबली गेली. आवारातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चालकाने बस थांबविली.

बसखाली अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यामुळे चालक कोळपे यांनी धुळे आगारप्रमुख आर. आर. वाघ यांच्याशी संपर्क साधून पोलिसांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस हिरे रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Dhule Crime News : सॉ-मिलमध्ये थरार; साडेसोळा लाखांवर रोकड, दागिन्यांची लूट

तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, मृत जवान अमृत शेवाळे त्रिपुरा सीआरपीएफ बटालियनमध्ये सेवारत होते.

१ ऑगस्टला ते रजेवर धुळ्यात आले. मंगळवारी (ता. २२) दुपारी चारला ते पत्नीला बाहेर जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ही घटना घडली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बुधवारी (ता. २३) त्यांच्यावर देऊर बुद्रुक येथे अंत्यसंस्कार झाले.

Death News
Dhule Crime News : लक्ष्मीनगरात 15 तोळे सोने लंपास; धुळेकर भयभीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()