Dhule News : लंडनच्या जॉनची इन्स्टाग्रामवर मैत्री अन् भेटायला आला घरी; 2 दिवस मुक्काम

John from London who came to visit Venkatesh Mistry's house.
John from London who came to visit Venkatesh Mistry's house.esakal
Updated on

Dhule News : एकेकाळी सर्वसामान्य माणसाकडे साधी फोन सुविधा नव्हती, पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर चालत असे. मित्र म्हटला की प्रत्यक्ष भेट झाली तरच व्हायचा, मात्र आता धावत्या जगात फेसबुक, इन्स्टाग्राम व्हॉट्सॲप अशा अनेकविध सुविधा सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे कुठेही संवाद साधला जातो, तसेच मैत्रीचे प्रमाणही अत्याधुनिक सुविधांनी सोयीस्कर झाले आहे.(John came from London to meet Instagram friend dhule news)

या सुविधांमुळे मैत्री व विचार जुळण्याचे साधन आधुनिक असल्याने थेट सातासमुद्रापार मैत्री जुळत असते अशीच प्रचीती निमगूळ (ता. शिंदखेडा) येथे आली.

येथील रहिवासी मिस्तरी हा सर्पमित्र आहे. त्याची ओळख लंडनस्थित जॉन याच्याशी इन्स्टाग्रामवर झाली. त्यालाही सापांची आवड आहे. तो भारतभ्रमणासाठी तीन वर्षांपूर्वी आला आणि थेट निमगूळला पोचला. त्यालाही सापांची आवड असल्याने तो भारतात भ्रमण करत असताना मित्रांना भेटायला येत असतो.

त्याला खेड्यांची संस्कृती आवडत असल्याचे सांगतो. त्याने बैलगाडी, गुरे शेतीचे फोटो घेतले. येथील व्यंकटेश मिस्तरी त्याचे मित्र असून, दर तीन वर्षांनी भेटायला येतो. त्याला ग्रामीण भागाची संस्कृती, राहणीमान, जेवण या सर्वांची जॉनला खूप आवड आहे.

John from London who came to visit Venkatesh Mistry's house.
Dhule News : आनंदाचा शिधा वाटप नसल्याने 'दिवाळी कडू' ! पोहे, साखर नसल्याने वितरण लांबणीवर

तो निमगूळला दोन दिवस व्यंकटेश मिस्तरी यांच्याकडे मुक्कामाला होता. रामी येथील सर्पमित्र राहुल गिरासे यांच्याकडेही तो दोन दिवस मुक्कामाला राहिला आणि पुढे तो मार्गस्थ झाला. दर तीन वर्षांनी जॉन ब्रोली हा भारतात येत असतो व तो मित्राला भेटल्याशिवाय जात नाही.

त्याला मराठी भाषा समजत नाही व ग्रामीण भागात त्याच्याशी फारसा संवाद साधता येत नाही. तरीही त्याला जे समजेल ते घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. निमगूळच्या व्यंकटेशला इंग्रजी येत नाही, मात्र बाकी इशाऱ्यावर काम करत त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो.

John from London who came to visit Venkatesh Mistry's house.
Dhule News : अध्यक्षांना राजीनामा देण्याचे सूचित : पालकमंत्री महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.