Dhule News : एकीकडे जल्लोष, दुसरीकडे निषेध; शिवसेनेबाबत निकालानंतर धुळ्यातील चित्र

शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर धुळ्यात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात जल्लोष केला
Shiv Sena workers cheering while welcoming the result given by the Assembly Speaker.
Shiv Sena workers cheering while welcoming the result given by the Assembly Speaker.esakal
Updated on

Dhule News : शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर धुळ्यात शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात जल्लोष केला.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध केला. (Jubilation after result regarding Shiv Sena ubt dhule news)

या ऐतिहासिक निकालाने खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी व्यक्त केली.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व एकमेकांना पेढे भरवत ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष केला.

जिल्हाप्रमुख श्री. मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे, आबा कदम, अजय पाटील, अनिल जगताप, समाधान शेलार, जुनेद शेख, शेखर बडगुजर, पवन शिंदे, सतीश गिरमकर, रवींद्र शिंदे, तुषार सैंदाणे, अमोल शिंदे, अक्षय भदाणे.

विपुल शिरसाठ, पार्थ गुरव, कुणाल मराठे, विनीत मोरे, तेजस पाटील, विनोद गायकवाड, श्रेयस सोनार, दीपक पाटील, मयूर निकम, कुणाल सूर्यवंशी, अजय जगदाळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Shiv Sena workers cheering while welcoming the result given by the Assembly Speaker.
Shiv Sena Agitation : वाढीव घरपट्टीच्या नोटिसा त्वरित मागे घ्या; शिवसेनेचे लक्षवेधी आंदोलन

लोकशाही पायदळी

आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी लोकशाही पायदळी तुडविली, सर्व नियम धाब्यावर बसवत निकाल दिला असा आरोप युवासेनेने केला.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप वैध असून भरत गोगावले यांचा व्हीप अवैध असल्याचे म्हटले, त्याच आधारावर शिंदे-फडवणीस सरकार हे अपात्र होते. से असताना स्वतः अध्यक्ष श्री. नार्वेकर निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात असे म्हणत हा निकाल सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित नाही.

असे म्हणत युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जुन्या महापालिकेसमोर विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. युवासेना जिल्हाप्रमुख हरीष माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे.

महानगर प्रमुख सिद्धार्थ करनकाळ, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुकाप्रमुख गणेश चौधरी, शहर संघटक जयेश फुलपगारे, शहर संघटक शुभम रणधीर, शुभम फुलपगारे, तरबेज शेख, शुभम मटकर, किशोर साळुंखे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Shiv Sena workers cheering while welcoming the result given by the Assembly Speaker.
Dhule News : योग्य निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; हीट अँड रन कायद्याविरोधात निदर्शने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.