Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अध्यादेश काढून यासंबंधी संघर्षाला पूर्णविराम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला यश आले. या निर्णयासह संघर्षातील विजयाचा आनंद मुख्यमंत्री शिंदे, लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या झिंदाबादच्या घोषणा आणि एकमेकांना पेढे भरवत येथे शनिवारी (ता. २७) साजरा झाला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत या अध्यादेशासंबंधी निर्णयाचे स्वागत करण्यात आले. (Jubilation in Dhule by special ordinance on Maratha reservation issue news)
शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, जिल्हा शिवसेनेकडून आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत अध्यादेश जारी केला.
तो जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला, असे सांगत श्री. मोरे व सहकाऱ्यांनी जल्लोष केला. श्री. मोरे म्हणाले, की मराठा समाजाचे लढाऊ नेते जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून प्रारंभ केलेल्या आंदोलनाला मुंबईच्या आझाद मैदानावर पोचण्याआधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या विशेष अध्यादेश काढून मान्य केल्या.
श्री. जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविले. कुणबी नोंदी मिळालेल्या ५७ लाख जणांना प्रमाणपत्र वाटप करणे, वंशावळी लागू करणे, सगेसोयरे यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासह मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसींच्या सर्व सवलती मराठा बांधवांना मिळाव्यात यासाठी श्री. जरांगे मुंबईच्या आझाद मैदानकडे आंदोलनासाठी निघाले.
या संदर्भात सरकारने अध्यादेश काढला. मुख्यमंत्री वाशीत आंदोलनस्थळी पोचले. अध्यादेशाची प्रत श्री. जरांगे-पाटील यांना दिली.
त्यामुळे प्रश्न मार्गी लागल्याने त्यांचे आभार मानत जल्लोषात श्री. मोरे, मराठा समाज अध्यक्ष राजेंद्र इंगळे, मराठा क्रांती युवा मोर्चा अध्यक्ष नीलेश काटे, हनुमंत आवताडे, अशोक सुडके, तुषार नवले, आबा कदम, अरविंद सुडके.
दत्तात्रय माळोदे, सुधीर मोरे, डॉ. अनिल पाटील, ललित देटे, रजनीश निंबाळकर, संदीप शिंदे, छोटू मराठे, पप्पू इथापे, हिमांशू भदाणे, संतोष खेडकर, अमर फरताडे, मनोज मराठे, सुनील वर्पे, सनी मोरे आदी उपस्थित होते.
बाबरे येथे आनंदोत्सव
बाबरे (ता. धुळे) येथे मराठा समाजबांधवांनी आतषबाजी करीत व पेढे वाटपातून मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज जरांगे झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
संजय भालेकर, योगेश पाटील, संजय मोरे, लक्ष्मण शिंदे, प्रकाश मराठे, दशरथ मोरे, समाधान मस्के, ज्ञानेश्वर गायकवाड, कैलास मराठे, भय्या पाटील, ईश्वर पाटील, समाधान मराठे, सोपान मराठे, महादू मराठे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.