Dhule Crime News : धुळ्यात कनिष्ठ सहाय्यक अटकेत; पंचायत समिती शाखा अभियंत्याकडेच लाच मागितली

Shyamkant Sonavane
Shyamkant Sonavaneesakal
Updated on

Dhule Crime News : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळे पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकास सोमवारी साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

कनिष्ठ सहाय्यकाने थेट शाखा अभियंत्यांकडूनच ही लाच मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली. (Junior assistant arrested in Dhule Panchayat Samiti demanded bribe from the branch engineer Crime News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Shyamkant Sonavane
Cyber Crime : लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा ऑनलाईन 'Gold Trading' स्कॅम माहितेय?

धुळे पंचायत समितीमधील शाखा अभियंता तथा तक्रारदार एप्रिल २०२२ पर्यंत रतनपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या कालावधीत या बीटचे विभागीय लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्यामकांत सोनवणे याने तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोनवणे याच्याविरुद्ध तक्रार झाली. नंतर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, हवालदार भूषण खलाणेकर,

शरद काटके, गायत्री पाटील, रोहिणी पवार यांनी पंचायत समिती आवारातून कनिष्ठ सहाय्यक सोनवणे याला तक्रारदाराकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस

Shyamkant Sonavane
Crime News : 'तुला मस्ती आलीये, आता जिवंत सोडत नाही'; इंदोलीत कोयत्याने सपासप वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.