म्हसदी : येथील चिचंखेडे रस्त्यालगतच्या मनकराई शिवारात रात्री उशिरा शेतात वन्य पशू बिबट्याच्या हल्ल्यात कालवड (वासरी) फस्त केली. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
येथील मनकराई शिवारात राजेंद्र वसंतराव देवरे यांचे शेत आहे. श्री. देवरे यांच्या शेतातच औताचे बैल आणि दुभती गाय बांधलेली असते. शनिवारी (ता.२४) रात्री उशिरा वन्यपशू बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवला.
आज सकाळी श्री. देवरे शेतात दूध काढण्यासाठी गेल्यावर ही घटना लक्षात आली. वन विभागास माहिती दिल्यावर वन कर्मचारी एकनाथ गायकवाड, भटू बेडसे, नितीन भदाणे आदींनी पंचनामा केला. वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे.
अनेकांना बिबट्याने दर्शन
दरम्यान, काकोर शिवारात अनेकांच्या दृष्टीस पडणाऱ्या बिबट्याने मनकराई शिवारात वासरीवर डल्ला मारल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतशिवारात बिबट्याच्या पावलांची ठसे आढळून आल्याने बिबट्याचा हमखास वावर असल्याचा दुजोरा मिळाला आहे.वन कर्मचाऱ्यांनी देखील बिबट्या असल्याची माहिती दिली.
सध्या रब्बी पिकांना भारनियमनामुळे रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागत आहे.रात्री - अपरात्री बिबट्याचा धोका अधिक असल्याची भीती शेतकरी,शेतात राहणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.रात्री शेतात असणाऱ्या लहान पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले आहे. बिबट्यास जेरबंद करत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
शेतकऱ्यांना शेतात रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती असून वनविभागाने पिंजरा लावून त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.