Dhule News : भाजीपाला निर्यातीतही कापडणे अग्रेसर! कष्टकरी शेतकऱ्यांचा Brand

Radish collected for market.
Radish collected for market.esakal
Updated on

कापडणे (जि. धुळे) : खानदेशात स्वातंत्र्यसैनिक आणि बँडपथकांमुळे सुपरिचित कापडणे (ता. धुळे) हे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही कांदा उत्पादकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आता हेच कापडणे कष्टकरी शेतकऱ्यांमुळे भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत अग्रेसर ठरते आहे. विशेष म्हणजे येथील भाजीपाला पोचल्यानंतरच बाजारातील लिलाव सुरू होतात. (kapadne leader in vegetable export Brand of hardworking farmers Dhule News)

खानदेशात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन कापडणे येथील शेतकरी घेतात. त्यामुळे हे गाव गेल्या चाळीस वर्षांपासून भाजीपाला उत्पादनाचे हब मानले जाते. गावातील सरासरी दोनशे ते अडीचशे शेतकरी भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहेत.

यात पूर्वी माळी समाज गुंतला होता. यापाठोपाठ पाटील आणि बडगुजर समाजही भाजीपाला उत्पादनात गुंतला आहे. त्यात संबंधित शेतकरी कुटुंबांसह अनेक तरुणांनी कष्टाच्या बळावर कापडण्याला या उत्पादनातून वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

या भाज्यांचे उत्पादन

कापडणे येथे पालक, भेंडी, गिलके, कारले, मुळा, टोमॅटो, मिरची, वांगे, मेथी, पोकळा, वाल, शेवगा, दुधी, फ्लॉवर, गवार, कोथिंबीर, सकवई, कांदा आदी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. कांद्याचे आगर म्हणूनही हा परिसर ओळखला जातो.

Radish collected for market.
Nashik News: मलनिस्सारण केंद्रांसाठी 530 कोटींचा प्रस्ताव; केंद्र सरकारकडून NMCला मंजुरीची अपेक्षा

रोज लाखोंची उलाढाल

येथील शेतकरी राज्यातील वाशी, मालेगाव, शहादा, सुरत, सेंधवा आणि धुळे येथील बाजारांमध्ये रोज सरासरी २० ते ३० टन भाजीपाला पाठवितात. यातून सरासरी चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होते. वीस ते तीस टन उत्पादनातून पाच लाखांची नगदी उलाढाल होते.

शिवाय रोज पाचशे मजुरांना काम मिळते. विविध वाहने भाजीपाला बाजारात नेतात. त्यामुळे रोज एकूण सहाशे ते सातशे हातांना रोजगार उपलब्ध होत असतो. स्थानिक बाजारात सायंकाळी ताजा आणि स्वस्त भाजीपाला उपलब्ध होतो.

भाजीपाल्याचा ब्रॅन्ड

सुरत आणि शहादा बाजारात तर कापडण्याचा भाजीपाला दाखल झाल्यानंतर लिलावास प्रारंभ होत असतो. येथील सियाराम, महादेव, पाचपावली असे भाजीपाल्याचे ब्रॅन्ड तयार झाले आहेत. या ब्रॅन्डच्या विक्रीनंतरच इतर शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचा लिलाव सुरू होत असतो.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Radish collected for market.
Nashik News : उद्यानांची दुरवस्था टवाळखोरांच्या पथ्यावर; खेळणी, ग्रीन जिम साहित्यांची मोडतोड

आर्थिक स्थैर्य लाभल्याचे समाधान...

कापडणे येथील युवा शेतकरी अनिल माळी म्हणाले, की भाजीपाला उत्पादनातून आर्थिक स्थैर्य लाभले. संबंधित प्रत्येक शेतकरी भाजीपाल्यातून खेळते चलन उपलब्ध करून घेतो. किती परवडते, किती कमवितो, नुकसान होते यापेक्षा भाजीपाला उत्पादनाच्या छंदातून उत्पादन दिवसेंदिवस वाढतेच आहे.

मुळा उत्पादक शेतकरी योगेश पाटील म्हणाले, की मुळा उत्पादनातून बऱ्यापैकी हाती पैसा खेळतो. रोज बाजारभावावर लक्ष ठेवावे लागते. त्यानुसार मुळा व इतर भाजीपाला बाजार समितीत विक्रीसाठी नेत असतो. मेहनतीतून आर्थिक स्थैर्य लाभत असल्याचे समाधान आहे.

Radish collected for market.
Citylinc Fare Hike : नव्या वर्षात शहर बससेवेत 7 टक्के दरवाढ; पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()