Nandurbar News : काटेसावरीच्या फुलांनी निसर्ग बहरला; झाड पक्ष्यांना करतेय आकर्षित!

katesavari trees are attracting birds by sustaining their existence nandurbar news
katesavari trees are attracting birds by sustaining their existence nandurbar newsesakal
Updated on

तळोदा (जि. नंदुरबार) : पक्ष्यांना स्वतःकडे आकर्षित करणारे काटेसावरीचे झाड सध्या सुंदर फुलांनी सजले आहे.

रस्त्यावर येता-जाता दिसणाऱ्या लालबुंद काटेसावरीच्या फुलांकडे निसर्गप्रेमींचे लक्ष नसेल तर नवलच! (katesavari trees are attracting birds by sustaining their existence nandurbar news)

तळोदा शहराच्या बायपास रस्त्यावर असणारे असेच एक काटेसावरीचे झाड समृद्ध जैवविविधतेची साक्ष देत सध्या लालबुंद फुलांच्या बहरांनी सजले आहे. तळोदा तालुक्यात अनेक काटेसावरीची झाडे आपले अस्तित्व टिकवून पक्ष्यांना आकर्षित करीत आहेत.

सावर, शेवरी, काटेसावर आदी नावांनी ओळखले जाणारे काटेसावरीचे झाड सध्या निसर्गप्रेमींसह सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र झाले आहे. हिंदीमध्ये सेमल, तर बंगालीत शेमूल व संस्कृतमध्ये शाल्मली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या झाडाच्या फुलांनी सध्या निसर्ग बहरला आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये पानगळ सुरू होऊन मार्चमध्ये या झाडावर एकही पान शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण झाड फुलांनी बहरून जाते.

या झाडाकडे शिंजीर, बुलबुल, छोटे पोपट, कोतवाल अशा प्रकारचे पक्षी फुलातील मधुरस, कळ्या व फुले खाण्यासाठी, तर फुलावर आलेले किडे खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे या झाडावर नेहमी पक्ष्यांचा वावर असतो. वटवाघळे, खारूताई यांचेही हे आवडते झाड आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

katesavari trees are attracting birds by sustaining their existence nandurbar news
Nashik News | मुंबई IITतर्फे 300 कर्मचाऱ्यांना स्तनपान, कुपोषण प्रशिक्षण : ZP CEO आशिमा मित्तल

या झाडाची फुले लालभडक लुसलुशीत व पाच पाकळ्या असलेली असतात. त्यामुळे अत्यंत सुंदर अशी दिसणारी ही फुले प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतात. त्यात पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असल्याने निसर्गातील जैवविविधतेसाठी काटेसावर झाड महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रत्येकाने या झाडाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा निसर्ग व पक्षीप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

"काटेसावर झाडावर सध्या फुलांचा बहर आला आहे. जैवविविधतेसाठी हे झाड अंत्यत महत्त्वाचे आहे. याचे वनस्पतिशास्त्रीय नाव बॉम्बॅक्स सिबा असे असून, इंग्रजीत यास इंडियन रेड कपोक म्हणून ओळखले जाते. पक्ष्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे झाड आहे. त्याचे संगोपन झाले पाहिजे." -प्रा. डॉ. महेंद्र माळी, वनस्पतिशास्त्र विभाग, वरिष्ठ महाविद्यालय, तळोदा

katesavari trees are attracting birds by sustaining their existence nandurbar news
Market Committee Election : जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.