शिरपूर (जि. धुळे) : येथील पावणेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेला माघ शुद्ध पौर्णिमा, रविवार (ता. ५)पासून सुरवात होणार आहे. श्री खंडेराव बाबा विकास संस्था, शिरपूर पालिका व प्रशासनातर्फे यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. (Khanderao maharaj yatra started from today in shirpur dhule news)
रविवारी सकाळी नऊला आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची महाआरती करून यात्रेला सुरवात केली जाणार आहे. या वेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, कोशाध्यक्ष किरण दलाल, सचिव गोपाल मारवाडी, विश्वस्त गुलाब भोई, गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, श्रीहरी यादगिरीवार, व्यवस्थापक महेश देवकर आदींनी संयोजन केले आहे.
२०१९ नंतर कोरोना संक्रमणामुळे यात्रोत्सव स्थगित करण्यात आला होता. गेल्या वर्षी संस्थानने प्रयत्न करूनही प्रशासनाकडून यात्रेची परवानगी मिळू शकली नव्हती. त्यामुळे यंदाची यात्रा अधिक भव्य स्वरूपात भरविण्यासाठी संस्थानचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
पोलिसांनी भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी दुकानांच्या मांडणीत काही बदल सुचविले आहेत. तसेच यापूर्वीच्या जागांवर पक्की बांधकामे झाल्यामुळे तेथे दर वर्षी वहिवाट असलेले पाळणे व अन्य मनोरंजनपर खेळांची साधने अन्यत्र हलविण्यात आली आहेत. भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.
ऐतिहासिक परंपरा
शहराची सीमा संपते तेथे अरुणावती नदीच्या काठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खंडेराव महाराज मंदिराची निर्मिती केली असून, ते शिरपूरचे ग्रामदैवत आहे. पावणेतीनशे वर्षांची यात्रेची परंपरा असून, ग्रामीण भागातून सहकुटुंब यात्रा व दर्शनासाठी येण्याची परंपरा रूढ आहे. खंडेराव बाबा विकास संस्थानकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासह विविध विकासकामे पूर्ण केली आहेत.
पशू बाजार सज्ज
खंडेराव महाराज यात्रेनिमित्त येथील बाजार समितीच्या आवारात गायी, बैल, म्हशी व घोडे यांच्या खरेदी-विक्रीसाठी पशू बाजार भरविण्यात येतो. विशेषत: पंजाब, उत्तर प्रदेशातील उमद्या घोड्यांसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. यात्रेच्या चार दिवसांपूर्वीच पशूंसह मालक दाखल झाले आहेत. राज्यभरातून जनावरांच्या खरेदीसाठी शेतकरी व व्यावसायिक येथे येतात.︘
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.