Crop Competition : शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन; भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी

crop
crop crop insurance
Updated on

Crop Competition : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अधिकाधिक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी खरीप हंगाम २०२३ पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,

असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले. (Kharif season 2023 crop competition District Superintendent Agriculture Officer appealed to more farmers to participate dhule news.)

पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार असून, खरीप हंगाम पीक स्पर्धेसाठी ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल व वरई अशा बारा पिकांची निवड केली आहे. रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांचा समावेश केला आहे.

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेशशुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, ८- अ उतारा, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जमातीचा असल्यास) आवश्यक राहील.

शेतकऱ्यांसाठी निकष

तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असली पाहिजे व ती जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. तालुका पातळीवरील पीक स्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांना भाग घेता येईल. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पीक स्पर्धेचे अर्ज शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांस एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crop
Soybean Crop : सोयाबीन पिकावर गोगलगायीचे संकट; पावसाच्या अनियमितपणामुळे पेरण्या लांबल्या

या पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर पहिले पाच हजार, दुसरे तीन हजार, तर तिसरे दोन हजार रुपयांचे बक्षीस राहील. जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार, दुसरे सात हजार, तर तिसरे बक्षीस पाच हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार, तर तिसरे ३० हजार रुपये बक्षीस असेल, असे श्री. तडवी यांनी सांगितले.

अर्जासाठी निर्धारित अंतिम मुदत

खरीप हंगामाच्या मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन भुईमूग, सूर्यफूल, वरई पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

तिन्ही स्पर्धांसाठी शेतकऱ्यांनी परिपूर्ण भरलेला अर्ज कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी केले.

crop
Crop Insurance Scheme : जिल्ह्यात 9 हजार शेतकऱ्यांकडून पीकविमा; नंदुरबार तालुका अव्वल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.