Nandurbar Crime News : लग्नासाठी मुलगी दाखविण्याचे सांगत गुजरातच्या युवकाचे अपहरण; 7 जणांना अटक

crime
crimeesakal
Updated on

Nandurbar Crime News : लग्नासाठी मुलगी दाखविण्याचे आमिष दाखवून मुलगी पाहणीसाठी आलेल्या गुजरातमधील युवकाचा परतीचा मार्ग रोखून त्याचा मोबाईल हिसकावून त्याचे अपहरण केले. तसेच सुटकेसाठी दहा लाखांची मागणी केली. हा प्रकार नंदुरबार-प्रकाशा रसत्यावर एका शेतात सुरू होता.

त्या वेळी पोलिसांचे वाहन जात असताना पोलिसांना काहीतरी संशयास्पद घटना वाटली. (Kidnapping of Gujarat youth asking to show girl for marriage nandurbar crime news)

त्या वेळी पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली असता सत्य घटना उघडकीस आली. या वेळी चार पुरुषांसह तीन महिला अशा सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरण करणारे नंदुरबार तालुक्यातील आहेत. बुधवारी दुपारी साडेतीननंतर हा प्रकार घडला.

सुरत येथील कापुद्रा पोलिस ठाण्याच्या मागे, कृष्णानगर येथील रहिवासी किरणभाई रामजीभाई देसाई (वय २८) गायी पाळून दुग्धव्यवसाय करतात. लग्नाचे वय झाल्याने त्यांचे नातेवाईक मोहनभाई रबारी (रा. तापी, गुजरात) यांनी चार-पाच दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील रविभाई (रा. शहादा) यांच्याशी संपर्क करून लग्नासाठी स्थळ बघण्याबाबत सांगितले होते.

त्यानुसार रविभाई यांनी किरणभाई देसाई यांना व्हॉट्सॲपवर काही मुलींचे फोटो दाखविले. त्यातील एक मुलगी पसंत पडली. स्थळ बघण्यासाठी बुधवारी (ता. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास किरणभाई देसाई त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रकाशा येथे पोचले, तेव्हा मुलगी दाखविणारे रविभाई त्यांना भेटले.

crime
Nandurbar Crime News : तक्रारदारच निघाला आरोपी! स्थानिक गुन्हे शाखेकडून घटनेचा उलगडा...

मुलींचे स्थळ दाखविले, परंतु व्हॉट्सॅपवर पाठविलेले मुलींचे फोटो व प्रत्यक्ष दाखविलेले स्थळ वेगळे असल्याचे किरणभाई देसाई यांना लक्षात आले. त्यांनी व्हॉट्सॲपवर दाखविलेल्या फोटोतील स्थळाबाबत विचारपूस केली असता त्यांचे दोन दिवसांपूर्वीच लग्न जमल्याबाबत रविभाई यांनी सांगितले.

त्यानंतर श्री. देसाई स्थळ बघण्यासाठी नकार देऊन घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा रविभाई यांनी स्थळ पाहण्यासाठी आणलेल्या दोन मुलींना नंदुरबार येथे सोडून देण्याबाबत विनंती केली. त्यांना गाडीत बसविले. नंदुरबार शहराच्या अलीकडे वाहनातील दोनपैकी एकीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करून वाहन थांबविण्यास सांगितले.

वाहन थांबविताच तेथे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील सात जण आले व दमदाटी करून त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात घेऊन गेले. स्थळ पाहण्यासाठी आलेल्यांचे मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. सुटकेसाठी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करू लागले. त्याच वेळी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे वाहन तेथून जात असताना पोलिसांना काहीतरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले, पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

crime
Nandurbar Crime News : पोलिस निरीक्षकाविरुद्ध अत्याचार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे नीलेश गायकवाड यांनी घटनेबाबतची माहिती पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याची वेगवेगळी पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले.

संशयितांना पकडले

किरणभाई रामजीभाई देसाई यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यातील संशयितांकडून माहिती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन महिलांसह सात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचे नावे अशी ः साईनाथ उदयसिंग ठाकरे (रा. धमडाई), नीतेश नथ्थू वळवी (रा. कोळदा), रणजित सुभाष ठाकरे (रा. कोळदा), विशाल शैलेंद्र लहाने (रा. नंदुरबार) व तीन महिलांचा समावेश आहे. उर्वरित संशयितांनादेखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

crime
Nandurbar Crime News : नवापूर वन विभागाने पकडले अवैध लाकूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.