Nandurbar News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १ मेपासून गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबवून ई-केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडीया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. (Kisan Yojana News Farmers should do e KYC for benefit of PM Kisan Yojana dhule news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर शेतकरी सदरात ओटीपीच्या आधारे, तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये व अँड्रॉईड मोबाईलवर पीएमकिसान ॲपवरसुद्धा ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या सुविधेमुळे लाभार्थ्यांना स्वत:सह अन्य ५० लाभार्थ्यांचेही ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. पीएम सन्मान योजनेचा अंखडीत लाभ घेता यावा यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीसाठी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर, तसेच नजीकच्या पोस्ट कार्यालयात जावून ई-केवायसी करावी.
जे शेतकरी ई-केवायसी करतील, त्यांनाच यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे आवाहन श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.