Dhule Crime News : कौटुंबिक वादातून कोतवालाकडून पत्नीचा खून

Officials of Sangvi Police Station during the Panchnama of nanda pawara murder incident site.
Officials of Sangvi Police Station during the Panchnama of nanda pawara murder incident site. esakal
Updated on

Dhule Crime News : कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा घालून तिचा खून केल्याच्या संशयावरून पतीला सांगवी पोलिसांनी अटक केली.

खुनाची घटना सोमवारी (ता. ७) सकाळी साडेसहाला मोहिदा (ता. शिरपूर) येथील सरपंच पाड्यावर घडली. संशयित कोतवाल पदावर नियुक्त आहे. (Kotwal killed wife dhule crime news )

नंदा बाळा पावरा (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ भायला नारसिंह पावरा (४०, रा. मोहिदा) याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नंदाचा विवाह बाळा महारू पावरा (४०) याच्याशी झाला असून, दोघेही भायला पावरा याच्या घराजवळच राहतात. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

बाळा पावरा व नंदा यांच्यात कौटुंबिक कारणावरून नेहमीच वाद होत असत. ६ ऑगस्टला रात्री आठला भायला पावरा याच्याकडे भाचा कार्तिक याने जाऊन वडील आईला मारहाण करीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials of Sangvi Police Station during the Panchnama of nanda pawara murder incident site.
Dhule Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चौकशीचा आदेश

भायला व त्याच्या मित्रांनी बाळा पावरा याच्या घरी जाऊन भांडण सोडविले. सोमवारी सकाळी साडेसहाला पुन्हा कार्तिकने मामाकडे जाऊन वडील आईला मारहाण करीत असल्याचे सांगितले.

तेथे पोचल्यावर बाळा पावरा याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्याचे आढळले. पोलिसपाटील स्वप्नील पावरा व सरपंच दत्तू पाडवी यांच्या मदतीने तिला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सांगवी पोलिसांनी संशयित बाळा पावरा याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Officials of Sangvi Police Station during the Panchnama of nanda pawara murder incident site.
Dhule Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने मुलाकडून बापाची निर्घृण हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.