धुळे : शहरात सोमवारी (ता.२) सकाळी एका हमाल कामगाराच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांच्या आत छडा लावला. ज्याचा खून झाला त्याच्यासोबत हमाली करणाऱ्यानेच उसनवारीच्या पैशातून हा खून केल्याचे समोर आले. संशयिताला पोलिसांनी पनवेल येथून अटक केली. (labor colleague killed another labor for lended money Dhule Crime News)
विजयकुमार झिन्नत गौतम (रा. मसिजिदिया पिंपरी, सिद्धार्थ नगर, उत्तरप्रदेश, ह. मु.भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) हा भंगार बाजारात हमाली करत होता. १ जानेवारीला रात्री त्याचा अज्ञात इसमाने हत्याराने वार करून खून केला. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक शौचालयाच्यामागे त्याचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला.
या बाबत मृताचा शालक बुद्धराम बिपत गौतम यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना हा गुन्हा राहुल अवधराम हरजन (गौतम) याने केला असून तो कळंबोली (पनवेल) येथे पळून गेल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.
त्यांनी तत्काळ पथकाला कळंबोली पनवेल येथे रवाना केले व तेथून राहुल अवधराम हरजन (गौतम, वय-२० मूळ रा. गोलहौरा, महथा, सिद्धार्थ नगर, उत्तरप्रदेश व ह. मु भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक निरीक्षक दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
असा केला खून
मृत विजयकुमार तसेच संशयित राहुल हे भंगार बाजारात हमालीचे काम करत होते. १ जानेवारीला ते दोघे अमळनेर येथे गेले होते. सायंकाळी धुळ्यात आल्यावर विजयकुमार याने राहुलला श्रीराम पेट्रोल पंपाजवळील पाण्याच्या टाकीजवळ बोलविले होते. त्या ठिकाणी दोघांमध्ये उधारीच्या पैशावरून वाद झाला.
यात राहुलने विजयकुमारला हाताबुक्याने मारहाण केली, नंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याच्या जवळील पैसे काढून घेतले. विजयने प्रतिकार केल्याने राहुलने घटनास्थळावरील झाडाची फांदी तोडून विजयकुमारच्या डोक्यावर व इतर ठिकाणी मारहाण करून त्याला ठार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.