Police Sports Competition : नंदुरबारचा संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Collector Manisha Khatri leading the women's team participating in the rope competition.
Collector Manisha Khatri leading the women's team participating in the rope competition.esakal
Updated on

नंदुरबार : तीन दिवसांपासून जिल्हा पोलिस दलाच्या कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या २२ व्या जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेत पोलिस मुख्यालय नंदुरबारच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे.

सर्वोत्कृष्ट पुरुष अॅथलॅटिक्सचा पुरस्कार पोलिस शिपाई भूषण चित्ते तर सर्वोत्कृष्ट महिला अॅथलॅटिक्सचा पुरस्कार महिला पोलिस शिपाई दिव्या वाघमारे यांनी पटकविला. सर्व पदक प्राप्त खेळाडूंचा जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नंदुरबार येथील कवायत मैदानावर २३ ऑगस्टपासून जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला होता. या क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस मुख्यालय नंदुरबार, शहादा विभाग, अक्कलकुवा विभाग असे चार संघ स्वीमिंग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग, १००, २००, ४००, ८०० मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल आदी क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते. प्रत्येक संघामध्ये साधारणत: ६० खेळाडू असे एकूण २४० सांघिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

Collector Manisha Khatri leading the women's team participating in the rope competition.
नाशिक : लष्करी हद्दीत ड्रोन दिसल्याने खळबळ

पोलिसांनी स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे : पाटील

पोलिस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते. पोलिस दलात दैनंदिन काम करीत असताना कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे कायमच दुर्लक्ष होत असते.

त्या सर्वांतून बाहेर पडून प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष पूरविले पाहिजे. पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांच्या कुटुंबीयांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, मटकी फोड, रस्सी खेच आदी खेळ खेळण्यात आले.

Collector Manisha Khatri leading the women's team participating in the rope competition.
MVP Election : पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्यात; अटीतटीची लढत

जिल्हाधिकारी खत्रींनी घेतला स्पर्धेत सहभाग

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी संगीत खुर्चीच्या खेळात सहभाग घेऊन पोलिस अंमलदारांच्या कुटुंबीयांचा उत्साह वाढविला. त्याचप्रमाणे पोलिस अंमलदारांचे कुटुंब विरुद्ध पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदार यांच्यात देखील रस्सी खेचचा खेळ खेळण्यात आला. त्यात पोलिस कुटुंबीयांच्या संघाचे नेतृत्व करीत जिल्हाधिकारी खत्री स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

त्यात त्यांचा विजय झाला. तसेच कार्यक्रमास उपस्थित जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व पत्रकार यांचे रस्सी खेच हा सामना उत्कंठा वाढविणारा होता. पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित कार्यक्रमात विजेते ठरलेल्यांना देखील यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.