SAKAL Exclusive : साक्रीसह तालुक्यात कायद्याचा धाक हवा; कार्यकाळ पूर्ण करणारे अधिकारी नियुक्तीची गरज

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हाभरात धडक कारवाया करत गुन्हेगारांना धडकी भरविली आहे.
District Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Nivritti Pawar
District Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Nivritti Pawar esakal
Updated on

Dhule News : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हाभरात धडक कारवाया करत गुन्हेगारांना धडकी भरविली आहे. अशा वेळी अधीक्षक धिवरे यांनी साक्री तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेकडेदेखील आता थोडे लक्ष घालून तालुक्यात कायद्याचा धाक वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

यासाठी कार्यकाळ पूर्ण करतील असे अधिकारी नियुक्त करण्याचीदेखील गरज निर्माण होते आहे. (Law enforcement is needed in Taluka including Sakri dhule news)

साक्री शहरासह तालुक्यात मागील काळात कायदा व सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याचे चित्र दिसून येते आहे. एकीकडे सतत चोऱ्या-दरोड्याचे प्रमाण वाढले असतानाच टवाळखोरीदेखील मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल, ढाबे, टपऱ्यांमध्ये अवैध दारू विक्री वाढली असून, प्रतिबंधक अमली पदार्थांचीदेखील विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व गंभीर प्रकारातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागत असून, हे थांबविण्याची गरज आहे.

याशिवाय आर्थिक फसवणुकीचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरुण-तरुणींचे पळून जाण्याचे वाढलेले प्रमाणदेखील गंभीर असून, यासाठी पोलिसांच्या सहकार्यासोबतच समुपदेशनातून मार्ग काढण्याची गरज निर्माण होते आहे.

पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज

साक्री तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा तालुका असल्याने धडक कारवाया करू शकणारे पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी पूर्णवेळ नियुक्त होणे गरजेचे आहे. नोव्हेंबर २०२२ ते आतापर्यंत पाच पोलिस निरीक्षक या ठिकाणी नियुक्त झाले असून, आता निवृत्ती पवार यांच्याकडे पोलिस निरीक्षकपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

District Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Nivritti Pawar
Dhule News : सोनगीरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

याआधीचे दोन अधिकारी बदलीविरोधात ‘मॅट’मध्ये गेल्याचे सांगण्यात येत असल्याने श्री. पवारदेखील किती काळ या ठिकाणी राहतील हा प्रश्नच आहे. या सर्व अस्थिरतेमुळे पोलिसांचा वचक कमी होऊन गुन्हेगारी कारवाया वाढीस मदत होते आहे.

एसपींनी लक्ष घालण्याची गरज

गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी विश्वात जरब निर्माण होत असताना श्री. धिवरे यांनी ही मोहीम आता साक्री तालुक्याकडेदेखील वळविण्याची गरज आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढत आहेत. शहरातदेखील हीच परिस्थिती असून, शहरातील वाहतूक समस्या, नशेखोरी करत बेदरकारपणे वाहन चालवत टवाळखोरीचे प्रमाणदेखील वाढते आहे. आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशा वेळी या गंभीर विषयात वेळीच लक्ष घालून हे थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

District Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Nivritti Pawar
Dhule Municipality News : 1 मालमत्ता सील, 3 नळ बंद; मनपा पथकांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()