LCBने 6 तासांत आवळला कारवाईचा फास; पोलिस अधिक्षकांनी केले बक्षिस जाहीर

Crime News
Crime News esakal
Updated on

धुळे : औरंगाबाद, कन्नड आणि आर्वी (ता. धुळे) शिवारात दरोड्यानंतर पसार झालेल्या संशयित सहापैकी तीन दरोडेखोरांना अवघ्या सहा तासांत जेरबंद करण्यास येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. दरोडेखोरांकडून बंदूक, दोन चाकू आणि चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील तीन दरोडेखोर नांदेड, तर अन्य तीन दरोडेखोर औरंगाबादमधील आहेत.

राकेश अमरनाथ कदम (रा. पुणे) हे मित्रांसह रविवारी (ता. २५) प्रवासामुळे रात्री येथील आर्वी शिवारात एका पेट्रोल पंपाजवळ झोपले. त्यावेळी दरोडेखोरांनी कदम यांच्या मोटारीवर दगडफेक करत काचा फोडल्या. त्यातील मित्रांना चाकूचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड व मोबाईल लुटला. नंतर दरोडेखोर पसार झाले. याबाबत कदम यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Crime News
Dhule News : अनाथ बालकांना मिळणार आधार; लाभासाठी पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांत तक्रार करावी

या पार्श्वभूमीवर समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दरोडेखोर लाल रंगाच्या कारने (एमएच १४ बीएक्स १५७३) मध्य प्रदेशकडे पळत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक अधिकारी संजय पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, पोलिस नाईक पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने हाडाखेड (ता. शिरपूर) शिवारात दरोडेखोरांना गाठले. कारमधून तिघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले.

Crime News
Dhule News : शंभर वर्षे जगण्यासाठी विषमुक्त भाजीपाला पिकवा

असे असताना साथीदार दरोडेखोर राजेश परशुराम राठोड, जगदीश शिवाजी पवार, योगेश शंकर पवार (तिघे रा. नांदेड, ह. मु. औरंगाबाद) शिरपूर येथून एसटीने औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने ताब्यातील दरोडेखोरांकडून तीन लाख किमतीची कार, लाखाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २६ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, वीस हजार किमतीचे चार मोबाईल, आठ हजार तीनशेची रोकड आणि दोनशे किमतीचे दोन चाकू, असा चार लाख ५४ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

निरीक्षक हेमंत पाटील यांना त्यांची चौकशी केली असता या दरोडेखोरांनी २४ डिसेंबरला रात्री आठला औरंगाबाद शिवारात धुळे- सोलापूर रोडवर कारमधील एकावर चाकू हल्ला करत सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल हिसकावून घेतला होता, नंतर कन्नड शिवारातही एका कारवर दगडफेक करत चौघांवर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील रोकड हिसकावून घेतल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

Crime News
Dhule News : कर्ज वाढल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

दहा हजाराचे बक्षीस जाहीर

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाच्या कामगिरीची प्रशंसा करत त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()