Dhule Crime News : रस्ते लूटमारीतील म्होरक्या गजाआड; एलसीबीची कारवाई

Police officers and teams present during the interrogation of the suspect in the road robbery case.
Police officers and teams present during the interrogation of the suspect in the road robbery case. esakal
Updated on

धुळे : रस्त्यावर वाहनांना अडवून लूटमार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला एलसीबीने गजाआड केले. त्याचे चार साथीदार फरार असले तरी ते एलसीबीच्या (LCB) रडारवर आहेत. त्यामुळे रस्तालुटीतील चौघेदेखील जेरबंद होतील.

टोळीतील दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (LCB arrested leader of gang that blocked vehicles on road and looted dhule crime news)

हेंकळवाडी (ता. धुळे) येथील समाधान ब्रिजलाल पाटील हा तरुण पिक-अप (एमएच ४६ बीबी९६७०) वाहनाने नवलनगरकडून नंदाळेकडे जात असताना अंबोडे (ता. धुळे) शिवारात डोंगराजवळ चार लुटारू स्विफ्ट कारमधून आले.

त्यांनी समाधान पाटील याचे वाहन अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने चाळीस हजारांची सोन्याची चेन आणि दहा हजारांची रोकड हिसकावली. या प्रकरणी पिक-अपचालक पाटील याने धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना तपासाचे आदेश दिले. याअनुषंगाने पोलिस निरीक्षक पाटील व पथकाने रस्ता लूट ही रमजान मेहबूब पठाण (रा. वडजाई रोड, धुळे) याने केल्याचे समजताच त्याला ताब्यात घेतले. रमजानने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Police officers and teams present during the interrogation of the suspect in the road robbery case.
Drinking Water Crisis : 24 तासाचे सोडा, सिन्नरला 4 दिवसाआडही पाणी नाही

विजय रामकृष्ण गायकवाड (रा. रामनगर, धुळे), वसीम हुसेन शेख ऊर्फ वसीम बाटला (रा. जनता सोसायटी) आणि सत्तार मेंटल (रा. पत्रावाली मशिदीजवळ, धुळे) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा करण्यासाठी मनोज शंकर पारेराव (रा. संघमा चौक, धुळे) याने स्वीफ्ट कार उपलब्ध करून दिली व समाधान पाटील याची माहिती दिली. मनोज पारेरावच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याची कबुली रमजान पठाणने दिली.

त्याच्याकडून पाच हजारांची रोकड व एक हजाराचा मोबाईल हस्तगत केला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनावरुन एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, अमोल जाधव, विनोद पाठक, जगदीश सूर्यवंशी, योगेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.

Police officers and teams present during the interrogation of the suspect in the road robbery case.
Sakal Impact : शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन; आमदार पावरांचे निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.