Dhule Crime News : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (ता. १२) रात्री शहरातील अॅडलॅब चित्रपटगृहासमोर एका बंद खोलीतील जुगारअड्ड्यावर छापा टाकला.
त्यात २७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.(lCB raid on gamblling base dhule crime news)
‘एलसीबी’चे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना शहरातील अॅडलॅब चित्रपटगृहासमोर एका बंद खोलीत विलास लोटन राजपूत, मनोज दीपक गवळी व भरत कापसे जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलिस पथकास कारवाईची सूचना देण्यात आली.
त्यानुसार योगेश राऊत, दिलीप खोंडे, हेमंत बोरसे, तुषार सूर्यवंशी, शशिकांत देवरे, प्रशांत चौधरी, देवेंद्र ठाकूर, सुशील शेंडे, जगदीश सूर्यवंशी, गुणवंत पाटील, कमलेश सूर्यवंशी, संजय सुरसे, कैलास महाजन तसेच शहर पोलिस ठाण्याचे दत्तात्रय उजे, साबीर शेख, अतुल बागूल, अमित रणमळे, तुषार पारधी, दोन पंचांसह घटनास्थळी रात्री नऊला दाखल झाले.
माहितीची खातरजमा केली असता एका बंद खोलीत काही व्यक्ती जुगार खेळताना तसेच खेळविताना आढळल्या. शकील मन्सुरी (रा. वडजाई रोड), शंकर हरळ (रा. शासकीय डेअरीजवळ, सहजीवननगर), आकाश कासोदे, विजय चौगुले (रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी), अनिस शाह (रा. कबीरगंज), भानुदास पानपाटील (रा. दगडी चाळ, स्टेशन रोड) यांच्यासह फिरोज शेख बशीर (रा. अजमेरानगर)
कुंदन शिंदे (रा. साने गुरुजी सोसायटी), जावेद खान (रा. तिरंगा चौक, ८० फुटी रोड), नाजीम काझी (रा. हजार खोली), दिलीप भदाणे (रा. जमनागिरी), जावेद खान (रा. मौलवीगंज), पांडुरंग चौगुले (रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी), साहेबराव मोरे (रा. रामनगर, मोहाडी), मच्छिंद्र लष्कर (रा. चक्करबर्डी, सुरत बायपास रोड), भाऊसाहेब पाटील (रा. अरिहंत मंगल कार्यालय, नटराज टॉकीजजवळ)
शाकिर हुसैन अन्सारी (रा. माधवपुरा), विलास लोटन राजपूत (रा. भावसार कॉलनी, जमनागिरी रोड), राज हरी चव्हाण (रा. चाळीसगाव रोड), विकास मोरे (रा. रामनगर, संघमा चौक), अशपाक शेख (रा. कबीरगंज), सागर भदेलेकर (रा. सिद्धेश्वर हॉस्पिटलजवळ), शाहरूक शेख, सलीम बशीर शेख (रा. शंभर फुटी रोड), शेख अंजुम हुसैन (रा. मोहम्मदीनगर), बापू जाधव (रा. फाशीपूल), बंडू गांगुर्डे (रा. नेहरूनगर, मास्तरवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून रोख २० हजार ७३० रुपये, ४९ हजारांची जुगाराची साधने तसेच एक लाख ३० हजारांच्या दुचाकी जप्त केल्या. चौकशीत मालक विलास राजपूत याने हा जुगारअड्डा मनोज गवळी, भारत कापसे यांच्या संगनमताने चालवत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी प्रल्हाद वाघ यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.