Dhule Leopard News : नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद; सर्च मिशन यशस्वी

Various images of caged cannibals in Shiwar.
Various images of caged cannibals in Shiwar.esakal
Updated on

Dhule Leopard News : देऊर खुर्द (ता. धुळे) शिवारात मेंढपाळाच्या चिमुरडीवर हल्ला करणारा आणि तीन दिवसांपासून वन विभागाला हुलकावणी देणारा नरभक्षक बिबट्या अखेर मंगळवारी (ता. २१) रात्री अकराच्या सुमारास पिंजऱ्यात कैद झाला.

ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे दिसताच रात्री गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी निःश्वास सोडला. (Leopard caged in forest department cage dhule news)

वन विभागाच्या सर्च मिशनमुळे देऊर खुर्द परिसरातील शेतकरी तात्पुरते भयमुक्त झाले असले, तरी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या संरक्षणाचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. धुळे तालुक्यात विशेषतः चिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मेंढपाळांच्या चिमुरडीवर हल्ल्यानंतर तीन दिवसांपासून धुळे, साक्री, पिंपळनेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तथापि, ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसतही होता. पण पिंजऱ्यात कैद होत नव्हता.

दुसरीकडे वन विभागाची धाकधूक वाढतच होती. मंगळवारी रात्री उशिरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसल्याने वन विभागाला मिशन सक्सेस झाल्याने हायसे वाटले. शेतकऱ्यांना धीर मिळावा, नरभक्षक बिबट्यास पकडण्याचे मिशन सुरू झाले.

बिबट्या जेरबंदसाठी मुख्य वनसंरक्षक हृषीकेश रंजन, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनात वन विभागाच्या दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, सहाय्यक उपवनसंरक्षक तथा पिंपळनेर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. अडकिने, गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल आशुतोष बच्छाव, धुळे प्रादेशिक‌ वन विभागाचे वनक्षेत्रपाल भूषण प्रभाकर वाघ, वन विभागाच्या पश्चिम घाटाचे वनक्षेत्रपाल भगवान गिते, गस्तीपथकाचे वनपाल एस. जी. जाधव, वनपाल पी. ए. पाटील, व्ही. एस. अहिरे, जी. टी. जाधव, राकेश पाटील, चेतन काळे, एकनाथ गायकवाड, पंडित खैरनार यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Various images of caged cannibals in Shiwar.
Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार; ग्रामस्थांचा बालकाच्या पार्थिवासह रास्ता रोको

अजूनही दहशत, भीती मात्र कायमच..!

बिबट्याला वन विभागाच्या कायद्यान्वये मिळालेले संरक्षण आणि वनक्षेत्रासह शेतशिवारात सहज उपलब्ध होत असलेल्या शिकारीमुळे त्यांच्या संख्येत दर वर्षी वाढ असल्याचे वन विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. विशेषत: धुळे आणि साक्री तालुक्यात दररोज कुठेना कुठे तरी पाळीव प्राण्यावर बिबट्या हल्ला करण्याची घटना घडते.

दुसरीकडे धुळे तालुक्यात तर गेल्या दोन महिन्यांपासून बालकांवर हल्ला करण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने पाळीव प्राण्यांसह मानवी जीवनालाही अधिक धोका असल्याची परिस्थिती उभी आहे. मानवी वस्तीकडे सावजाच्या शोधार्थ धाव घेणाऱ्या बिबट्यामुळे वन विभागही हतबल झाल्याचे चित्र आहेच.

बिबट्याचा सर्वाधिक धोका चाऱ्यासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळ बांधवांना अधिक आहे. कारण ‘रात्री एकटे फिरू नये’ हा वन विभागाचा सल्ला आहे.

Various images of caged cannibals in Shiwar.
Dhule Leopard News : नरभक्षक बिबट्या ‘रेस्क्यू’च्या शिकंज्यात; दहशत मोडीत पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.