Dhule Leopard News : नरभक्षक बिबट्या ‘रेस्क्यू’च्या शिकंज्यात; दहशत मोडीत पण...

Leopard captured by forest department.
Leopard captured by forest department.esakal
Updated on

Dhule Leopard News : धुळे तालुक्यात निष्पाप तीन बालकांचा बळी घेणारा आणि बोरी पट्ट्यासह काही भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला सोमवारी (ता. ३०) पहाटे साडेपाचला हेंद्रूण शिवारात वन विभागाच्या रेस्कू टीमने शिंकज्यात घेतलेच.

बिबट्याला बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीने चीतपट केल्यावर दहशतीखालील नंदाळे, बोरकुंड, होरपाडा, मोघण, हेंद्रूणसह अन्य गाव परिसरातील शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. (leopard captured by forest department dhule news)

मात्र बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर तिसरे बालक रमेश नानसिंग पावरा (वय ९) याचा हिरे मेडिकलच्या रुग्णालयात रविवारी मृत्यू झाल्याने शोक प्रकट झाला.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात नंदाळे बुद्रुक शिवारात रविवारी (ता. २२) चार वर्षीय दिदी शिवराम पावरा हिचा बळी, नंतर मंगळवारी (ता. २४) होरपाडे शिवारात सहा वर्षीय स्वामी दीपक रोकडे याचा बळी आणि गुरूवारी (ता. २६) मोघण शिवारात नऊ वर्षीय रमेश पावरा या बालकावर पहाटे सहाला हल्ला झाल्यानंतर तो मृत्यूशी झुंज देत होता.

त्याचे रविवारी (ता. २९) निधन झाले. या घटनांनंतर शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी दिवसरात्र ५० कर्मचाऱ्यांचे पथक नेमत पिंजरे, २० ट्रॅप कॅमेरे, ड्रोनची मदत घेतली.

सर्वांना मिळाला दिलासा

आमदार कुणाल पाटील यांनीही मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केल्यावर बिबट्याच्या शोधासाठी नाशिक, पुणे येथील रेस्क्यू टीम पाठविण्यात आली. आठवड्यापासून बिबट्याचा धुमाकूळ आणि दहशतीमुळे विविध गावांतील संचारबंदीसारखे चित्र होते. भीतीमुळे घराबाहेर पडण्यास कुणी धजावत नव्हते.

Leopard captured by forest department.
Dhule Leopard Attack : मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे वाचले प्राण!

शेती क्षेत्र ओस पडले. मजूर गावाकडे परतले. त्यामुळे कापसाच्या वेचणीसह अन्य शेती कामे ठप्प पडली. दरम्यान, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री अडीचनंतर वन विभागाच्या सहकार्याने हेंद्रूण, मोघण, बोरकुंड परिसरात सापळा रचला आणि नरभक्षक बिबट्यास पकडण्याचे मिशन सुरू झाले.१४-१

रेस्क्यू मिशनला यश

ग्रामस्थांना धीर मिळावा आणि रेस्क्यू टीम, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावे यासाठी मुंबईहून परतल्यावर आमदार पाटील यांनी हेंद्रूण-मोघणला भेट दिली. हल्ल्यातील पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. रात्री बारापर्यंत ग्रामस्थांसह परिसरात तळ ठोकून होते. चार दिवसांपासून सुरू असलेल्या रेस्क्यू मिशनला सोमवारी यश लाभले.

विभागीय वन अधिकारी (दक्षता) तथा नोडल अधिकारी आर. आर. सदगीर यांनी सांगितले, की नियमानुसार २२ ऑक्टोबरपासून बिबट्याची शोधमोहीम सुरू केली. त्याला जेरबंद करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले. या अनुषंगाने धुळे वन विभागांतर्गत पाच गस्तीपथके, दोन पथके बिबट्यास बेशुद्ध करणे, चार पथके जनजागृतीसाठी कार्यरत झाली. १४-१

शोधासाठी यांचे योगदान

बिबट्याच्या शोधकार्यात मुख्य वनसंरक्षक हृषीकेश रंजन, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक विनायक खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, वन परिक्षेत्र दक्षता अधिकारी आशुतोष बच्छाव, शिरपूरचे के. डी. देवरे, शिंदखेड्याचे मंगेश कांबळे, पिंपळनेर पश्‍चिम घाटचे डी. एस. गिते, पिंपळनेरचे डी. आर. अडकिणे, कोंडाईबारीच्या अधिकारी सविता सोनवणे, जळगावचे वनपाल गणेश गवळी, नेहा पंचमिया यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे सदस्य तुहीन सातारकर, डॉ. चेतन वंजारी, किरण रहाळकर, अभिजित महाले, अमित तोडकर, एकनाथ मंडल, आयुष पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.

Leopard captured by forest department.
Dhule Leopard News : बिबट्याकडून बैल फस्त; वन्यपशूंची भक्ष्यासह पाण्यासाठी भटकंती

जळगावचे मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई, योगेश वारुडे यांचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून टेन्टची सुविधा मिळाली.

हेंद्रूण-मोघण शिवारात बिबट्या सापडला

रेस्क्यू पथक आणि वन विभागाने हेंद्रूण-मोघण शिवारात रचलेल्या व्यूहरचनेत बिबट्या सापडला. त्यास बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि त्यास जेरबंद केले. पथकांकडून प्राप्त माहिती व बिबट्याच्या फोटोच्या आधारे सोमवारी पहाटे साडेपाचला शेतकरी अशोक पुंडलिक पाटील यांच्या मोघण येथील शेतात बिबट्याने ठार केलेल्या शेळीजवळ दक्षताचे विभागीय वनाधिकारी तथा नोडल अधिकारी आर. आर. सदगीर यांच्या नियंत्रणात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन वंजारी यांनी बिबट्याला बेशुद्ध केले. नंतर त्याला संयुक्त पथकातील सदस्यांनी पिंजऱ्यात जेरंबद केले.

वनमंत्री, अधिकारी, पथकांचे आभार

आमदार कुणाल पाटील यांनी तालुक्यातर्फे बिबट्याला पकडल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन विभागाचे अधिकारी आणि संयुक्त पथकांचे अहोरात्र परिश्रमाबद्दल आभार मानले व कौतुक केले. नरभक्षक बिबट्याला जेरबंद केल्याने बोरी परिसरातील भीतीचे वातावरण निवळले आहे.

जनतेच्या हितासह रक्षणासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावत उभा राहण्यासाठी बांधील आहे. कोणत्याही संकटात धुळे तालुक्यातील जनतेसोबत राहाणे माझे कर्तव्य असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. हल्ल्यात बळी गेलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना संपूर्ण आर्थिक मदत लवकर प्रदान व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leopard captured by forest department.
Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यातील तिसऱ्या बालकाची मृत्यूशी झुंज; शोधासाठी ट्रॅप कॅमेरे, ड्रोनचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.