म्हसदी :येथील गावालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या मनकराई शिवारात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडत आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वारावर बिबट्या धावून आला. बिबट्या मक्का पिकात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी रात्री वन कर्मचाऱ्यांनी गस्त घालत बिबट्यास पांगविण्यासाठी लाकूड पेटवले. बिबट्या आगीस घाबरत असला तरी वनविभागाने पिंजरा लावत बिबट्यास जेरबंद करत भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे.
बिबट्याचे वाढते धाडस
यंदा मुबलक पाणी असल्याने शेतशिवार गजबली आहेत. उभा ऊस व मका सारख्या पिकात बिबट्या दबा धरून बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढत्या भारनियमनामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर जागून रहावे लागते.पाठीमागून कधी बिबट्या येईल आणि हल्ला करेल हे सांगता येत नाही असे परिसरातील शेतकरी सांगत आहेत. रवींद्र वाघ व त्यांच्या पत्नी रेखाबाई वाघ शेतात मुक्कामी असतात. उभयतांनी अनेक वेळा बिबट्याला पाहिले आहे.
बिबट्यास जेरबंदीची मागणी
म्हसदीसह परिसरात मोठे वनक्षेत्र आहे. प्रत्येक शिवारात बिबट्या दिसणे वा पाळीव प्राणी फस्त करणे हे नित्याचे झाले आहे. वनविभाग खरंच या गोष्टीचे गांभीर्य घेईल का...? असा संतप्त सवाल उपस्थित करत आहेत. वन कर्मचाऱ्यांना हे सर्व माहीत असूनही कानावर हात ठेवले जात आहेत. म्हणूनच मनकराई शिवारातील शेतकऱ्यांनीक व्यथा मांडली आहे. वनविभागाने रात्रीची गस्त वाढवत दिलासा दिला असला तरी बिबट्यास जेरबंद करत भयमुक्त करावे अशी मागणी केली अशी मागणी केली अशी मागणी केली जात आहे.
एकटे - दुकटे शेतशिवारात फिरु नये. रात्री फटाके वाजवून बिबट्यास हुसकावून लावा. पाळीव प्राणी बंदिस्त ठेवा.
-एस. डी. देवरे, वनपाल, म्हसदी
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.