Dhule News: मराठा आरक्षणाचा प्रश्‍न लवकर सोडवा; भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र

While giving a letter of support to the protestors who sat on a chain hunger strike for the reservation of the Maratha community, MP Dr. Subhash Bhamre and BJP officials.
While giving a letter of support to the protestors who sat on a chain hunger strike for the reservation of the Maratha community, MP Dr. Subhash Bhamre and BJP officials.esakal
Updated on

Dhule News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न लवकर सोडवा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल केले.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मागासलेला आहे. (Letter to Chief Minister to solve issue of Maratha reservation dhule news)

समाजाला आरक्षण मिळावे ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. तसेच धुळे शहर व ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. आपण सगळेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र समाजबांधवांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत. तसेच मनोज जरांगे-पाटील यांची तब्येतदेखील नाजूक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

साखळी उपोषणाला पाठिंबा

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी धुळे शहरात सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. उपोषणाच्या ठिकाणी भेट देत खासदार डॉ. भामरे व पदाधिकाऱ्यांनी मागणीला पाठिंबा दिला.

भाजपचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, नगरसेवक सुनील बैसाणे, अमोल मासुळे, बबनराव चौधरी, भूपेश बडगुजर, जीवन शेंडगे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, आरती पवार, कल्याणी अंपळकर, योगिता बागूल यांच्यासह सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, भोला वाघ, निंबा मराठे, संदीप पाटोळे, भय्या शिंदे, राजू इंगळे, दीपक रौंदळ, रजनीश निंबाळकर, वीरेंद्र मोरे, संदीप सूर्यवंशी, अर्जुन पाटील, मुन्ना शितोळे, श्याम रायगुडे, वामन मोहिते, नितीन पाटील, राजेश पवार आदी उपस्थित होते.

While giving a letter of support to the protestors who sat on a chain hunger strike for the reservation of the Maratha community, MP Dr. Subhash Bhamre and BJP officials.
Dhule News : चौकशीस तक्रारदार आमदार शाह 6 वेळा राहिले अनुपस्थित : संजय बारकुंड

दरम्यान, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीही सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र भांग्या मारुतीतर्फे पाठिंबा

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला स्वतंत्र भांग्या मारुती व्यायामशाळेतर्फे प्रथम महापौर भगवान करनकाळ यांच्यासह सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजातील गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी व युवकांना आरक्षणाचा लाभ मिळावा केंद्र, राज्य सरकारने लवकरात लकवर पावले उचलावीत, अशी मागणी व्यायामशाळेतर्फे धुळ्याचे माजी महापौर भगवान करनकाळ यांच्यासह यशवंत देवकर, रमेश पाटील, संजय गावडे, रामदास जगताप, पांडुरंग गायकवाड, नितीन थोरात, नीलेश महाले, भिका चौधरी, राहुल गायकवाड आदींनी केली. मागणीसह आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र आंदोलकांना दिले.

While giving a letter of support to the protestors who sat on a chain hunger strike for the reservation of the Maratha community, MP Dr. Subhash Bhamre and BJP officials.
Dhule News : अधिकाऱ्यांचा घराकडे पळ, मुख्यालये ओसाड! मुख्यालय न सोडण्याचा मनपा आयुक्तांचा आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.