Dhule Crime: पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप; कोकणगावच्या घटनेत न्यायाधीश बेग यांचा निकाल

 Court Order
Court Order esakal
Updated on

Dhule Crime : कोकणगाव (ता. साक्री) येथील पत्नीच्या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. जे. बेग यांनी पतीस जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरीच्या शिक्षेचा आदेश दिला.

भारतीबाई हिचा चौदा वर्षांपूर्वी आरोपी गोरख एकनाथ चव्हाण याच्याशी विवाह झाला होता. त्यांना मुलगा, मुलगी आहे. आरोपी गोरख यास दारुचे व्यसन होते. तसेच तो कोणताही कामधंदा करीत नव्हता. (Life imprisonment for husband in wife murder case Dhule Crime news)

दारू पिवून तो सतत पत्नी भारतीबाई हिला मारहाण आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्या छळास कंटाळून भारतीबाई यांच्या मामाने भारतीबाई यांना मुलांसह कोकणगाव येथे आणले. अशात २१ जून २०१९ ला सकाळी साडेनऊला भारतीबाई घराजवळच कपडे धुवत होती. काही अंतरावर मामा, तानाजी भावराव माळी, तिचा भाऊ दीपक परशराम माळी उभे होते. त्यांना काही समजण्याच्या आत आरोपीने गोरख चव्हाण याने मागून येत मोठा दगड भारतीबाईच्या डोक्यात टाकत तिचा निर्घृण खून केला.

या प्रकरणी तिचे मामा, तानाजी भावराव माळी, दीपक परशराम माळी यांनी आरोपीचा पाठलाग केला. परंतु, तो हाती लागला नाही. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आरोपी गोरख चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी या खुनाचा सखोल तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

 Court Order
Dhule Crime News : देवपूरातील 3 कॅफेंवर पोलिसांचा छापा; कॅफेचालकांविरूद्ध गुन्हा

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांची साक्ष झाली. त्यात फिर्यादी सुकदेव काळू गायकवाड, काशिनाथ भावसिंग माळी, दीपक परशराम माळी, पंच श्रीराम चौरे, शवविच्छेदन अधिकारी डॉ. नीलेश केशवराव भामरे, कोरोना काळात तपास अधिकारी पंजाबराव राठोड यांचा मृत्यू झाल्याने त्यांची स्वाक्षरी ओळखण्यासाठी तत्कालीन पोलिस ठाणे अंमलदार प्रकाश भीमराव लोहार यांचा समावेश होता. घटनास्थळी आरोपी हा उपस्थित होता, असे त्याने मान्य केले होते.

खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्‍त सरकारी अभियोक्ता पराग मधुकर पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केला. तो ग्राह्य मानत न्यायाधीश बेग यांनी आरोपी गोरख चव्हाण (वय ४५) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याकामी पैरवी अधिकारी हवालदार हरीश पुंडलिक गढरी यांचे सहकार्य लाभले.

 Court Order
Dhule Crime News: गांजाची तस्करी ‘एलसीबी’ने रोखली; धुळ्यात ट्रकसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.