Dhule News : मद्य तस्कर दिनू डॉनला परभणीतून अटक; धुळे तालुका पोलिस ठाण्याची कामगिरी

Sanjay Barkund giving reward to Police Inspector Dattatray Shinde and team after arresting criminal Dinu Don.
Sanjay Barkund giving reward to Police Inspector Dattatray Shinde and team after arresting criminal Dinu Don.esakal
Updated on

Dhule News : तुरी देऊन निसटणाऱ्या मद्य तस्कर दिनू डॉन ऊर्फ दिनेश निंबा गायकवाड याला धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने परभणीतून अटक केली.

सात महिने पाठशिवणीचा खेळ चालल्यानंतर त्याला तालुका पोलिस ठाण्याने अखेर बेड्या ठोकल्याच.

तो पोलिसांच्या तावडीत सापडल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह पथकाला पाच हजारांचे बक्षीस प्रदान केले. (Liquor smuggler Dinu Don arrested from Parbhani Performance of Dhule Taluka Police Station Awarded to team by Superintendent including Shinde Dhule News)

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ४ डिसेंबर २०२२ ला एक ट्रक (एमएच ४१, एयू २१२४) पकडला. त्यातून बनावट मद्याची अवैध वाहतूक केली जात होती.

पोलिस अधीक्षक बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिंदे आणि पथकाने कारवाईतून मद्य ताब्यात घेतले. यात ९५ लाख ७७ हजार ८०० किमतीची बनावट दारू, त्यासंबंधी साधने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sanjay Barkund giving reward to Police Inspector Dattatray Shinde and team after arresting criminal Dinu Don.
Dhule News : ...अन्यथा मनपा आवारात अंत्यसंस्कार; वलवाडी स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा प्रश्‍न

गुन्ह्यातील १० पैकी ९ संशयितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य संशयित दिनेश निंबा गायकवाड ऊर्फ दिनू डॉन (रा. शिरूड, ता. धुळे) हा गुन्हा घडल्यापासून फरारी होता. तो दाखल झाल्याच्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजेच सात महिन्यांपासून गायब होता.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिंदे आणि पथक संशयित दिनूच्या मागावर होते. पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार प्रवीण पाटील, उमेश पवार, कुणाल पानपाटील यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे दिनू डॉनचा शोध सुरूच ठेवला होता. तो मोबाईल सिमकार्ड आणि मोबाईल बदलत होता.

गोवा, उत्तर प्रदेश, बिहारसह त्याने नेपाळमध्ये मुक्काम ठोकला होता. अखेर गंगाखेड (जि. परभणी) येथे दिनू डॉन असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला तेथे बेड्या ठोकण्यात आल्या. श्री. बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक महाजन, हवालदार पाटील, पवार, कुणाल पानपाटील यांनी ही कारवाई केली.

Sanjay Barkund giving reward to Police Inspector Dattatray Shinde and team after arresting criminal Dinu Don.
Viral News : पोलिसाच्या बायको पोरांची नोटांच्या बंडलांसह सेल्फी अन् मग जे घडलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.