Nandurbar Crime News : नंदुरबार येथे येणाऱ्या दोन वाहनांसह ४५ लाख ७० हजारांचा मद्यसाठा नंदुरबार शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई जगतापवाडी परिसरात रस्यावर झाली.
या प्रकरणी एकजण पोलिसांच्या ताब्यातून निसटला, तर वाहनासह मद्यसाठा व दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. (Liquor stock worth 45 lakh 70 thousand seized along with 2 vehicles by police nandurbar news)
जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना बुधवारी (ता. १२) एक पिक-अप व इनोव्हा वाहनांमधून नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात अवैध दारू येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले. श्री. कळमकर यांनी स्वत: त्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकांसह नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रोडवर सापळा रचला.
रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी करीत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे इनोव्हा भरधाव येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्यास सांगितले, मात्र चालकाने भरधाव चालवून पुढे निघून गेले, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला; परंतु वाहनचालकाने काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला.
वाहनचालकास पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यास नाव-गाव विचारले असता शिवाजी बाबूलाल चौधरी (वय २९, रा. पडावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे, ह.मु. जगतापवाडी, नंदुरबार) असे सांगितले. त्याचा एक साथीदार पळून गेला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पिक-अप (एमएच ३९, सी ७३०६) या वाहनाची तपासणी केली असता त्यात १४ लाख ४० हजार ७६८ रुपये किमतीचे एकूण २५६ खाकी रंगाच्या पृष्ठाचे बॉक्स त्यात प्लॅस्टिकच्या सीलबंद बाटल्या एकूण ४८ नग त्याचप्रमाणे एकूण १२ पॉलिथिन थैल्या प्रत्येकी थैली एकूण ४८ नग मद्याच्या बाटल्या अशा एकूण १२ हजार ८६४ नग बाटल्या,
प्रत्येकी बाटलीची किंमत ११२ रुपये किंमत असलेली आढळले, तसेच सहा लाख रुपये किमतीचे पिक-अप वाहन (एमएच ३९, सी ७३०६) असा एकूण २० लाख ४० हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही दारू कोणाची आहे याबाबत ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीस विचारणा केली असता, त्याने हा माल मुकेश चौधरी (वय ३३, रा. म्हसावद, ता. शहादा, जि. नंदुरबार, ह.मु. जगतापवाडी) याचा असल्याबाबत सांगितले. त्यास ताब्यात घेतले.
त्याच्या घरासमोर उभी असलेली टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा पांढऱ्या रंगाच्या वाहना (एमएच ४३, व्ही ६३५४)बाबत विचारले असता ही गाडी त्याचीच असल्याबाबत सांगितले.
तिची पाहणी केली असता त्यात चार लाख ३० हजार ८० रुपये किमतीचे एकूण ८० खाकी रंगाच्या पृष्ठ्याचे दारूचे बॉक्स आढळले. त्यात १८० मिलिलिटर प्लॅस्टिकच्या ४८ सिलबंद बाटल्या आल्या.
दोन्ही व्यक्तींच्या वाहनातून एकूण १८ लाख ७० हजार रुपये किमतीची अवैध विदेशी मद्य व २७ लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने असा एकूण ४५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पळून गेलेल्या एकासह नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.