Nandurbar Crime News : आमलाड-बहुरुपा रस्त्यावर 8 लाखांचा मद्यसाठा जप्त

Liquor stock worth 8 lakh seized in Malad Bahurupa road Nandurbar Crime News
Liquor stock worth 8 lakh seized in Malad Bahurupa road Nandurbar Crime Newsesakal
Updated on

Nandurbar Crime News : तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा रस्त्यावर एका उसाच्या शेतालगत आयशर गाडीत सुमारे आठ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी जप्त केला.

मात्र चालक फरारी झाला. पोलिसांनी मद्यसाठा व गाडीही जप्त केली. (Liquor stock worth 8 lakh seized in Malad Bahurupa road Nandurbar Crime News)

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरूपादरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची समजले. त्या माहितीच्या आधारे दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. पाळत ठेवली.

त्यादरम्यान आमलाड-बहुरूपा रस्त्यावर एका उसाच्या शेतालगत तपकिरी रंगाची एक आयशर गाडी (एमएच १८ बीजी १८५१) आढळून आली. तिची तपासणी केली असता त्यात सुमारे आठ लाखांचा मद्यसाठा आढळला. त्यात सात लाख सत्तर हजार दोनशे बत्तीस रुपयांच्य मद्यासह आठ लाख किमतीची आयशर गाडीही जप्त करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Liquor stock worth 8 lakh seized in Malad Bahurupa road Nandurbar Crime News
Nandurbar Crime News : नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल व्यावसायिकांवर हल्ला

असा एकूण पंधरा लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तळोदा पोलिसांत अज्ञात वाहन चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहाययक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, अविनाश केदार, सागर गाडीलोहार, पुना पाडवी, अजय पवार, विलास पाटील, विजय जावरे, संदीप महाले, महिला एएसआय संगीता बाविस्कर यांच्या पथकाने केली. चालक वाहन सोडून फरारी झाला आहे.

Liquor stock worth 8 lakh seized in Malad Bahurupa road Nandurbar Crime News
Jalgaon Crime News : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने न्हावी गावात दगडफेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.