Dhule School Video: शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या; धुळ्यामधील घटना

Chocolate News: धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळून आलेल्या आहेत. लहानग्यांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ बघून चीड निर्माण होत आहे. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील भोनगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला.
Dhule School Video: शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या; धुळ्यामधील घटना
Updated on

धुळेः नुकतंच पुण्यामध्ये एका व्यक्तीला चॉकलेटमध्ये अळ्या दिसून आल्या होत्या. त्याने याची तक्रारदेखील केली आहे. ही घटना ताजी असतानाच धुळ्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेट्समध्ये अळ्या दिसून आलेल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त होतोय.

धुळ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आढळून आलेल्या आहेत. लहानग्यांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ बघून चीड निर्माण होत आहे. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील भोनगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला.

विशेष म्हणजे चॉकलेटवर दाखविण्यात आलेली एक्सपायरी डेट अद्याप संपलेली नाही, तरीही चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.