Dhule Lumpy Disease : जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील एकूण ४९ गावांमध्ये पशुधनाला लम्पी स्किन रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संबंधित गावे बाधित क्षेत्र व या गावांच्या पाच किलोमीटर परिसराला सतर्कता क्षेत्र घोषित करून उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.(Livestock infected with lumpy skin disease in 49 villages dhule news )
प्रादुर्भावग्रस्त गावांपासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील गोवंशीय जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, यात्रा, पशू प्रदर्शने पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा आदेशही दिला आहे.
संबंधित गाव परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरांवर योग्य तो उपचार करावा, इतर जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे. प्रादुर्भावग्रस्त गावांपासून दहा किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील गोवंशीय जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, यात्रा, पशू प्रदर्शने इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत.
साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराईकरिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहांची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी.
सहकार्य न केल्यास कारवाई
लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा व महापालिका यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करावे, त्यांचे लसीकरण करून घेणेकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.
दरम्यान, कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या व कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी यांच्याविरुद्ध नियमांनुसार गुन्हा दाखल करणे तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील सहाय्यक आयुक्त/पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी गोयल यांनी आदेशात म्हटले आहे.
या गावांमध्ये लागण
-धुळे तालुका ः देवभाने, सातरणे, न्याहळोद, विंचूर, सडगाव, फागणे, अजनाळे, बोरविहीर, धुळे शहर, चिंचखेडा, अकलाड, नवलाणे, सोनगीर, बाबरे, बुरझड, कुसुंबा, तरवाडे, लामकानी, आर्वी, शिरूड.
-शिरपूर तालुका ः थाळनेर, विखरण खुर्द, सुकवद, अहिल्या प्र., जातोडा, तऱ्हाडी, खारीखान, भोरटेक.
-शिंदखेडा तालुका ः धावडे, मालपूर, दोंडाईचा शहर, विखरण, दलवाडे, चिरणे, खर्दे, आरावे.
-साक्री तालुका ः आमोदे, वाघापूर, दिघावे, जेताणे, कुत्तारमारे, कढरे, सुकापूर, साक्री शहर, बल्हाणे, लव्हारतोंडो, रोहोड, जामादे, बाल्हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.