OBC Reservation : धुळ्यात 22 ला महामेळावा; ओबीसी समाजाच्या बैठकीतील सूर

Citizens present at the meeting.
Citizens present at the meeting.esakal
Updated on

OBC Reservation : धुळे येथे रविवारी (ता. २२) ओबीसी आरक्षण अधिकारासंदर्भात होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी पिंपळनेर येथील श्री मुरलीधर मंदिरात ओबीसी समाज घटकांसमवेत नियोजन बैठक घेण्यात आली.

बैठकीत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागूल यांनी उपस्थित ओबीसी समाज घटकाला मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने धुळे येथे होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.(Mahamelava of OBC community meeting on 22 october dhule news)

या संदर्भात तैलिक समाजाचे व समता परिषदेचे पांडुरंग सूर्यवंशी यांच्याकडे लेखी पत्र दिले. अखिल भारतीय माळी महासंघाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गवळी अध्यक्षस्थानी होते. राजेश बागूल यांनी बोलताना सांगितले, की २७ टक्के ओबीसींसाठी असलेले आरक्षण टिकविण्यासाठीची ही अस्तित्वाची लढाई आहे.

आरक्षण भीक नाही अधिकार आहे. २७ टक्के आरक्षणात ४०० पेक्षा अधिक जाती समाविष्ट आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी असून, जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी बोलून दाखविली.

सर्व जातीतील लोक कर भरतात, मग सारथी आणि भारती या संस्थेला कोट्यवधी रुपये अनुदान कसे दिले जाते? आणि महाज्योतीला तुटपुंजी मदत केली जाते, हा भेदभाव का, असा सवाल उपस्थित करीत भुजबळांसोबत राहा, पुढच्या पिढीसाठी हा लढा असून, हीच वेळ आहे, समाजजागृतीसाठी एकत्र येण्याची व संघटन करण्याची हीच वेळ आहे.

सर्व समाज अध्यक्षांनी एकत्र येऊन समाजात संघटन उभे करावे, समता परिषदेचे भुजबळांचे हात बळकट करून हा लढा लढायचा आहे, ही केवळ माळी किंवा तेली यांची लढाई नव्हे तर एकूण ४०० जातींच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले. दबावगट निर्माण करून २२ ऑक्टोबरला एकत्र या व सांख्यिकी दर्शन घडवा, हीच ताकद आपले अस्तित्व टिकवून ठेवणार असल्याचे शेवटी सांगितले.

Citizens present at the meeting.
OBC Reservation : ओबीसी समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे - रमेश बारसकर

बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य पी. एस. पाटील, तेली समाज अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष रवींद्र खैरनार, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश शिरसाट, सुभाष नेरकर, मुरलीधर मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे, डॉ. गुलाब पगारे, गिरीश पगारे, कांतिलाल माळी, प्रकाश पगारे, अरविंद शिरसाट, गोविंदराव सोनवणे, योगेश शिरसाठ, चेतन क्षीरसागर, राकेश सोनवणे, विजय मोगरे, रवींद्र सोनवणे, राकेश शेवाळे, सुरेश नहिरे, रवींद्र खैरनार, निंबा एखंडे, शिवा जिरे पाटील, चेतन पगारे, आकाश पगारे, रिंकू सोनवणे, सुरेश बागूल, रामकृष्ण मोगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

इतरांच्या आरक्षणात लुडबूड नको

अखिल भारतीय माळी महासंघाचे राजेंद्र गवळी यांनी आपल्याला इतरांच्या आरक्षणात लुडबूड करायची नाही, ओबीसींसाठी दिलेले २७ टक्के आरक्षण हे कायम ठेवून ज्यांची मागणी आहे अशा समाजामध्येही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठीही शासनाने वेगळे स्वतंत्र आरक्षण द्यावे असे संबोधित केले.

भुजबळांच्या समता परिषदेमार्फत ओबीसींचे आरक्षण टिकविण्याचा जो लढा सुरू केला आहे, तो केवळ एका माळी समाजासाठी नव्हे तर इतरही ४०० जातींचा समावेश आहे, असे सांगून परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ, बाळासाहेब कर्डक व दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत धुळे येथे होणाऱ्या महामेळाव्यास ओबीसी समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Citizens present at the meeting.
OBC Reservation : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ओबीसी आरक्षणाचा एल्गार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.