नंदुरबार : शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी (ता. राहता, जि. अहमदनगर) येथे २४ ते २६ मार्च या कालावधीत महापशुधन एक्स्पो-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. (Mahapasudhan Expo 2023 organized from 24 to 26 March in shirdi nandurbar news)
या अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनास नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
पशू प्रदर्शन ४६ एकर विस्तीर्ण जागेवर होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमधील उत्कृष्ट पशुधन, पशुपक्षी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनातून पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशुपक्षी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे.
भव्य डॉग व कॅट शो, ४०० पेक्षा जास्त स्टॉल, भारतातील विविध जातींचे एक हजार ३०० पेक्षा जास्त पशुधन, प्रात्यक्षिके, मुरघास, बंदिस्त शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन, गांडूळखत, मुक्तसंचार गोठा, चारा पिके, गोड्या पाण्यातील मत्स्यशेती, शासनाच्या विविध योजनांच्या सादरीकरणाबरोबरच संयंत्रे, मुरघास, अझोला, लिंग निर्धारित रेतमात्रा, दूध, मांस, अंडी, लोकर, उत्पादन तंत्रज्ञान माहिती, बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी, वैरण उत्पादन, प्रात्यक्षिके आदींची माहिती प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
याच कालावधीत शेतकरी, शास्त्रज्ञ तांत्रिक चर्चासत्रे होणार आहेत. प्रदर्शनामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग व पशुपालक यांचाही सक्रिय सहभाग असणार आहे.
प्रदर्शनाचे औचित्य साधून नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, वित्त समिती सभापती गणेश पराडके, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या महा पशुधन एक्स्पो-२०२३ लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
या वेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रताप पावरा, सहाय्यक आयुक्त डॉ. कुलकर्णी, पशुधन विकास अधिकारी डॉ. निकुंभे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.