Teacher Convention : शिक्षक संघाचे रत्नागिरीत 17 फेब्रुवारीला अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Maharashtra State Primary Teachers Association Convention
Maharashtra State Primary Teachers Association Conventionesakal
Updated on

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन (Convention) १७ फेब्रुवारीला रत्नागिरी येथील चंपक मैदानात होणार आहे. (Maharashtra State Primary Teachers Association Convention on 17 Feb cm Eknath Shinde prominently present nandurbar news)

अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.

अधिवेशनाला नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहनही नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे.

अधिवेशनास स्वागताध्यक्ष म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिक्षकनेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष आंबादास वाजे आदी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनास जुन्या पेन्शनचा प्रश्न प्रमुख प्रश्न म्हणून मांडला जाणार आहे.

वरिष्ठ व निवडश्रेणी नियमिततेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे, वैद्यकीय बिलासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुखपद शंभर टक्के शिक्षकांमधून भरणे, महिला शिक्षकांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करणे,

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Maharashtra State Primary Teachers Association Convention
Girish Mahajan | भाजपमध्ये प्रवेशासाठी अनिल देशमुखांचा आग्रह : गिरीश महाजन

ऑनलाइन बदली प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून ३० जून २०२३ अर्हता तारीख धरून बदली प्रक्रिया राबविणे, रजा रोखीकरणाचा लाभ मिळावा इत्यादी महत्त्वाच्या मागण्या चर्चा करून सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

अधिवेशनास शासनाने १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी अशी विशेष रजा मंजूर करण्यात आली असून, अधिवेशनास नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकारी सभासद व शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा नेते हंसराज पाटील, सल्लागार मादर्शक वसंत पाटील, संजीव पाटील, संजय बागूल,

राज्य प्रतिनिधी किशोर पाटील, प्रवीण देवरे, जिल्हा सरचिटणीस अमोल शिंदे, महिला आघाडीप्रमुख उज्ज्वला बेडसे, कविता जाधव, संजय घडमोडे, संजय बाविस्कर, आनंदराव करनकाळ, मनोज पवार, भगवान बागूल, राजेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, संजय जाधव, जितेंद्र बोरसे, शशिकांत पाटील यांनी केले आहे.

Maharashtra State Primary Teachers Association Convention
Onion Rates Fall : कांदा भाव घसरणीने 3 दिवसात 15 कोटींचा फटका! पाकिस्तानकडून आयात बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()